मुंबई

नितीन उड्डाणपुलावर सहा वाहनांचा विचित्र अपघात

CD

नितीन उड्डाणपुलावर सहा वाहनांचा विचित्र अपघात

टेम्पोचालक गंभीर जखमी; वाहतुकीवर परिणाम

ठाणे, ता. ४ : नाशिक-मुंबई महामार्गावरील नितीन उड्डाणपुलाजवळ सोमवारी दुपारी सहा वाहनांचा विचित्र अपघात घडला. या अपघातात एका टेम्पोचालकाला गंभीर दुखापत झाली असून, इतर वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन उड्डाणपुलाजवळील टाटा मोटर्स शोरूमसमोर नाशिकहून ठाण्याकडे येणाऱ्या मार्गावर एकामागोमाग सहा वाहनांची धडक झाली. या घटनेची माहिती वाहतूक पोलिस कर्मचारी दिलीप पाटील यांनी दुपारी १.४७ वाजता ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. माहिती मिळताच वाहतूक पोलिस, नौपाडा पोलिस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात टेम्पोचालक सेख शाबीर महमूद (२२) गंभीर जखमी झाला असून, त्याच्या डाव्या हाताला व पायाला दुखापत झाली आहे. त्याला तातडीने उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्त दोन वाहने घटनास्थळावरून निघून गेल्याची माहितीही समोर आली आहे. या अपघातात टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, इतर वाहनांचे किरकोळ ते मध्यम नुकसान झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? तारखेबाबत महत्त्वाची अपडेट समोर...

Pimpri Chinchwad fire: पिंपरी-चिंचवड हादरले! भंगार गोदामातील भीषण आगीने परिसर धुराने व्यापला, ६० जवानांची शर्थ

Fifa World Cup 2026 : ९० मिनिटं, पुतळ्यासारखा उभा राहतो हा माणूस; कोण आहे Michel Nkuka Mboladinga? तो असं का करतो? Video

Kolhapur Water Lifting Ban : कोल्हापूर, सांगलीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! 'या' नद्यांवरील पाणी उपसाबंदी अखेर शिथिल; जलसंपदा विभागाचा आदेश जारी

Tutari Express: तुतारीचं इंजिन बिघडलं, आधीच ४ तास उशिरा त्यात आणखी २ तास विलंब; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT