बेकायदा झोपड्यांवर
कारवाई सुरू ठेवा!
मुंबई, ता. ४ : वांद्रे पूर्व स्थानकालगतच्या गरीबनगर झोपडपट्टीतील बेकायदा बांधकामांवरील कारवाई सुरुच ठेवा, असे आदेश नुकतेच उच्च न्यायालयाने पश्चिम रेल्वे प्रशासनाला दिले; मात्र या मोहीमेदरम्यान ऑगस्ट २०२१ मधील सर्वेक्षणांतील पात्र झोपडीधारकांचे संरक्षण करण्याचेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले. न्यायालयाच्या निर्णयामुळे गरीबनगर येथील पात्र झोपडीधारकांना दिलासा मिळाला आहे. वांद्रे रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या गरीबनगर झोप़डपट्टीवासीयांचे १० आणि ११ ऑगस्ट २०२१ मध्ये दोन टप्प्यांत सर्वेक्षण झाले आहे. त्यातील पात्र झोपडीधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करेपर्यंत न्यायालयाने संरक्षण दिले होते. न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाने अशा पात्र झोपडीधारकांच्या हिताचे पुरेसे संरक्षण होणे अनिवार्य असल्याचेही प्रामुख्याने स्पष्ट करून ते कायम ठेवण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.