मुंबई

नसरापूरातील नराधमाला तातडीने फाशी द्या

CD

नसरापुरातील नराधमाला तातडीने फाशी द्या!
उपमुख्यमंत्र्यांकडे आमदार दिलीप लांडे यांच्यासह ग्रामस्थ शिष्टमंडळाची मागणी

घाटकोपर, ता. ६ (बातमीदार) ः नसरापूर-भोर येथील चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या भीमराव कांबळे या लिंगपिसाट नराधमावर बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यांतर्गत जलदगती न्यायालयात खटला चालवून तातडीने कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी मागणी चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप लांडे यांच्यासह संतप्त ग्रामस्थ शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली आहे.
माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेत अवघ्या चार वर्षांच्या लहान मुलीवर आरोपीने अत्याचार करून तिची हत्या केली. याप्रकरणी राजगड पोलिसांनी अपहरण, बलात्कार, हत्या यासह पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आरोपीवर यापूर्वीही विनयभंग, लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. या नराधमाला फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी वडगाव-पुणे येथील वीर बाजी पासलकर पूल ते नवले पूलदरम्यान नागरिकांनी चार तास रास्ता रोको करून उद्रेक व्यक्त केला. चिमुकलीचा मृतदेह असलेल्या रुग्णवाहिकेसमोर तिचे आईवडील आणि नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. हे प्रकरण हे समाजासाठी संवेदनशील आणि गंभीर असल्याने जलदगती न्यायालयात हा खटला चालवण्यात यावा आणि मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी आमदार लांडे यांनी उपमुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे.
या वेळी उपस्थित ग्रामस्थ शिष्टमंडळात सरपंच अनिल गयावळ, उज्ज्वला जंगम, ज्योती चव्हाण, स्वाती काजळे, संदीप कोळपे, प्रसन्न गयावळ, योगेश जंगम, वागेश वाल्हेकर, माउली शेटे, अमित रांजणे, अक्षय कांटे यांचा समावेश होता. चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाविरुद्ध शासन कडक पावले उचलणार आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी ग्रामस्थांना आश्वासित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वरुणराजा तर विदर्भात सूर्य कोपणार; पुढचे २ दिवस धोक्याचे

SRH vs PBKS Live: चुकीला माफी नाही! सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांची दादागिरी; पंजाब किंग्सला महागात पडला ढिसाळपणा

Sunetra Pawar: मोठा राजकीय निर्णय! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा; महाराष्ट्रात फुलफोकस एंट्री

विजयला रोखण्यासाठी कट्टर शत्रू एकत्र येणार? तामिळनाडुत राजकीय भूकंपाची शक्यता, DMK अन् AIDMKच्या आघाडीची चर्चा

SRH vs PBKS Live: ३ झेल अन् १ स्टम्पिंगची संधी गमावली... पंजाबच्या खेळाडूंनी युझवेंद्र चहलवर रडण्याची वेळ आणली Video Viral

SCROLL FOR NEXT