मुंबई

परदेशी शिक्षणासाठी मदतीचा बहाणा

CD

परदेशी शिक्षणासाठी मदतीचा बहाणा
डॉक्‍टरला १३.६३ लाखांचा गंडा; फरार महिलेस पाच महिन्यांनंतर अटक

अंधेरी, ता. ६ (बातमीदार) ः कांदिवलीतील एका डॉक्टरच्या मुलीला उच्च शिक्षणासाठी विदेशात पाठविण्यास मदत करण्याची बतावणी करून १३ लाख ६३ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रद्धा विठ्ठल गाडेकर या महिलेस पाच महिन्यांनंतर चारकोप पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यात स्टेला मेहता आणि राकेश मेहता हे दोघेही सहआरोपी असून ते दोघेही या कटातील मुख्य आरोपी आहेत.
मुंबईसह ठाण्यात त्यांच्याविरुद्ध अशाच प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. यातील तक्रारदार डॉक्टर असून ते कांदिवली परिसरात राहतात. त्यांच्या मुलीला उच्च शिक्षणासाठी विदेशात जायचे होते. याचदरम्यान त्यांना कांदिवलीतील चारकोप परिसरात असलेल्या कॅरिअर अ‍ॅण्ड ऑप्शन या कंपनीची माहिती समजली होती. या कंपनीचे मालक स्टेला आणि राकेश मेहता असून त्यांच्याकडे श्रद्धा गाडेकर ही कामाला होती. ती कंपनीचे सर्व आर्थिक व्यवहार पाहत होती. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी त्यांना त्यांच्या मुलीला मास्टर ऑफ ट्रेड अ‍ॅण्ड लॉजिस्टिकमध्ये नेदरलँड्सच्या व्हिटनबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांना मुलीच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जाची गरज होती. त्यासाठी त्यांनी त्यांना मदत केली होती. या कर्जातून त्यांनी काही रक्कम स्टेला, राकेश आणि श्रद्धा या तिघांना दिली होती.
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर स्टेला मेहता, राकेश मेहता आणि श्रद्धा गाडेकर या तिघांविरुद्ध नोव्हेंबर २०२५ रोजी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत गेल्या पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या श्रद्धा गाडेकर हिला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ती पोलिस कोठडीत असून तिची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या तिघांनी आतापर्यंत किती विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

अनेकांची फसवणूक केल्‍याचे उघडकीस
दिलेल्या मुदतीत तिला तिथे प्रवेश मिळवून दिला नाही. विचारणा केल्यानंतर ते तिघेही वेगवेगळे कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे ते कांदिवलीतील कार्यालयात गेले होते. तिथे त्यांना कंपनीचे कार्यालय बंद असल्याचे दिसून आले. चौकशीअंती या तिघांनी अनेकांना विदेशात उच्च शिक्षणासाठी पाठविण्यास मदत करतो, असे सांगून त्यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी तिन्ही आरोपींविरुद्ध चारकोप पोलिस ठाण्यात तक्रार केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Match Ban: मोठी बातमी! पाकिस्तानी खेळाडू भारतात येऊ शकतील, पण...; भारत-पाकिस्तान सामन्यांवर सरकारचा महत्त्वाचा निर्णय

T20 Mumbai League: श्रेयस अय्यर, अंगकृश रघुवंशी एकाच संघात! आकाश पारकर १२ लाख रुपयांच्या सर्वोच्‍च बोलीसह करारबद्ध

Tamil Nadu political drama विजयसमोर पेच! सत्तास्थापनेचा दावा केला पण बहुमतच नाही; राज्यपालांनाही विश्वास नाही, जादुई आकडा कसा गाठणार TVK?

Stray Dog : देगलूरात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याचा उच्छाद; पंधरा ते सोळा नागरिक जखमी, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनाही चावा

चक्क ४९% Gen Z लोक फसवणुकीच्या जाळ्यात अडकता-अडकता वाचले; लिंक्डइनचा इशारा, नोकरी शोधताना 'हे' चुकीचे संकेत ओळखा

SCROLL FOR NEXT