मुंबई

तेरा लाखांच्या अपहारप्रकरणी आरोपीस अटक

CD

१३ लाखांच्या अपहारप्रकरणी आरोपीस अटक
फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सहआरोपी फ्लॅटमालकाचा शोध सुरू

अंधेरी, ता. ६ (बातमीदार) ः १३ लाखांच्या मोठ्या ठेवीच्या अपहारप्रकरणी अब्दुल रज्जाक शेख ऊर्फ डाबला या आरोपीस समतानगर पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यात तो सध्या पोलिस कोठडीत आहे.
शब्बीर हद्दीश शेख ऊर्फ पप्पू हा फ्लॅटमालक सहआरोपी असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. यातील तक्रारदार महिला कांदिवली परिसरात राहते. तिच्या चाळीतील रूम पुनर्विकासासाठी गेल्याने तिला भाड्याने एक रूम हवी होती. याचदरम्यान तिच्या पतीचा मित्र असलेल्या अब्दुलने त्याचा मित्र शब्बीर याचा कांदिवलीतील बाणडोंगरी, सुमुख हिल्स इमारतीमध्ये एक फ्लॅट असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ती तिच्या पतीसोबत शब्बीरला भेटून फ्लॅट पाहण्यासाठी गेली होती. या वेळी शब्बीरने तिचा अकराव्या मजल्यावर फ्लॅट असल्याचे सांगून त्याला तो फ्लॅट १३ लाखांच्या हेवी डिपॉझिटवर द्यायचे आहे, असे सांगितले. तिने त्याच्यासोबत भाडेकरार केला होता. त्यासाठी तिने त्याला १३ लाख रुपये दिले होते. त्यापैकी १० लाख ऑनलाइन तर तीन लाख कॅश स्वरूपात दिले होते; मात्र त्याने तिला फ्लॅटचा ताबा दिला नाही. त्याच्याकडून फ्लॅटचा ताबा देण्यास उशीर होत असल्याने तिने त्यांच्यातील व्यवहार रद्द करून तिच्या पैशांची मागणी सुरू केली होती; मात्र त्याने फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा हेवी डिपॉझिटची रक्कमही परत केली नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने अब्दुल शेख आणि शब्बीर शेख यांच्याविरुद्ध समतानगर पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. याच गुन्ह्यात दीड महिन्यांपासून फरार असलेल्या अब्दुल शेख याला पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT