अंधारातून उजेडाकडे गोराई किनारा!
अदाणी इलेक्ट्रिसिटीची कामगिरी; अडीच किलोमीटर पट्ट्यावर पथदिव्यांची रोषणाई
मुंबई, ता. ६ : उंच सखल, खडकाळ आणि वाळूने भरलेल्या समुद्रकिनाऱ्यावर पथदिवे लावणे कठीण असले तरी अदाणी इलेक्ट्रिसिटीने नवीन तंत्रज्ञान वापरून अडीच किलोमीटरचा हा पट्टा आता प्रकाशमान केला आहे.
गेली अनेक वर्षे या किनाऱ्यावर दिवे नसल्यामुळे संध्याकाळनंतर पर्यटकांचे तसेच स्थानिक रहिवाशांचे हाल होत होते. प्रतिकूल प्रकारच्या जमिनीमुळे आणि खाऱ्या हवेमुळे येथे पथदिवे लावणे आणि ते सुस्थितीत ठेवणे कठीण झाले होते. त्यामुळे संध्याकाळनंतर येथे पर्यटक फिरकत नव्हते. अशा स्थितीत स्थानिकांच्या उपजीविकेवरही परिणाम झाला होता.
अशा स्थितीत गंज लागू नये, यासाठी आणि इलेक्ट्रिसिटीने तेथे उच्च घनतेचे पॉलिथिलिन पाइप आणि रिएन्फोर्स्ड काँक्रीट फाउंडेशन वापरून खांब उभारले. तर त्याच प्रकारचे डक्ट उभारून भूमिगत केबलचे खारा वारा आणि खाऱ्या पाण्यापासून संरक्षण केले. नेहमीच्या केबलऐवजी तेथे इन्सुलेटेड केबल वापरून अर्थिंग पॉइंट तयार केले. सव्वापाच मीटर उंचीच्या दिव्यांचे ९० खांब उभारून तेथे विशेष ब्रॅकेट लावून हा सारा परिसर प्रकाशमान केला.
येथे रस्ते नसल्याने दुरुस्ती आणि उभारणीसाठी मोठी यंत्रसामुग्रीदेखील आणणे कठीण होते. मात्र आता या खांबांची देखभाल शिडीच्या आधारे करण्याची व्यवस्था केली आहे. हा परिसर प्रकाशमान झाल्यामुळे आता पर्यटक तसेच स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला, असे गोराई गावठाण पंचायतीचे सरपंच रॉसी डिसूझा यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.