मुंबई

अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर

CD

बेकायदा बांधकामांवर बुलडोझर
बोईसरमधील गाळे, निवासी खोल्या जमीनदोस्त

बोईसर, ता. ६ : बोईसर मंडळ हद्दीतील मौजे काटकर, सरावलीतील बेकायदा बांधकामांवर मंगळवारी महसूल विभागाने कारवाई केली. या वेळी गाळे तसेच निवासी खोल्या जमीनदोस्त करण्यात आल्या.
काटकर येथील रामचंद्रनगर, गणेशनगर परिसरात संदीप संखेने उभारलेले १० हजार ४२० चौरस फूट क्षेत्रातील चार वाणिज्य गाळे, विनोद बारगा यांच्यासह नऊ निवासी खोल्या तसेच दीपक पटेल यांचे पत्र्याचे तीन वाणिज्य गाळे हटवण्यात आले. याशिवाय सरावली येथील अवधनगर परिसरात निर्मला नामदेव घरत यांचे दोन अपूर्ण वाणिज्य गाळेही पाडण्यात आले. या कारवाईदरम्यान नऊ वाणिज्य गाळे, नऊ निवासी खोल्यांचे अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले.
---------------------------
कठोर कारवाईचा इशारा
अविभाज्य शर्तीच्या जागेवर कोणतीही अधिकृत परवानगी न घेता बांधकाम सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली. तसेच अशा प्रकारच्या बेकायदा बांधकामांविरोधात भविष्यातही कठोर कारवाई करण्याचा इशारा महसूल विभागाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

७०व्या वर्षी नेत्याचं २० वर्षीय तरुणीशी चौथं लग्न, दुसऱ्या पत्नीची पोलिसात धाव; ११ अपत्यांचा बाप, मुलं न झाल्यानं तिसरीला घटस्फोट

IND vs PAK Match Ban: मोठी बातमी! पाकिस्तानी खेळाडू भारतात येऊ शकतील, पण...; भारत-पाकिस्तान सामन्यांवर सरकारचा महत्त्वाचा निर्णय

अवघ्या 24 तासांत बदलणार कन्या राशीसकट आणखी दोन राशींचं नशीब ! बुधाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मिळणार पैसाच पैसा

T20 Mumbai League: श्रेयस अय्यर, अंगकृश रघुवंशी एकाच संघात! आकाश पारकर १२ लाख रुपयांच्या सर्वोच्‍च बोलीसह करारबद्ध

Tata Motors टाटा एस गोल्ड+ XL लाँच; अधिक पेलोड, अधिक कमाई, उद्योजकांसाठी नवे संधीचक्र

SCROLL FOR NEXT