मुंबई

समाजोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा

CD

वज्रेश्वरी, ता. ६ (बातमीदार) : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त भिवंडी लोकसभा क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. समाजोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श पुढे ठेवत जवळपास ४५० गावांमध्ये हे उपक्रम राबविण्यात आले.
या उपक्रमांमध्ये रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, स्वच्छता अभियान, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, महिलांसाठी आरी वर्क प्रशिक्षण, शिलाई मशीन प्रशिक्षण तसेच युवकांसाठी कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या सर्व उपक्रमांना स्थानिक नागरिक, महिला, युवक-युवती यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
नीलेश सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजासाठी काहीतरी सकारात्मक योगदान देण्याच्या उद्देशाने हे सर्व उपक्रम राबविण्यात आले. विशेषतः महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण कार्यक्रम, युवकांमध्ये क्रीडा व आरोग्याची जाणीव निर्माण करण्यासाठी क्रीडा स्पर्धा तसेच आरोग्य व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला.
या सर्व उपक्रमांचे नेतृत्व भिवंडी लोकसभाप्रमुख मोनिका पानवे यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम यशस्वी केले.
नीलेश सांबरे यांच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त अशा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजहित जपण्याचा संदेश देण्यात आला. या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यास हातभार लागेल, असा विश्वास मोनिका पानवे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT