मुंबई

गार्डवेल इंडस्ट्रीजच्या ऑटोमेटेड सेफ डिपॉझिट लॉकर प्रणालीचे

CD

राऊत यांच्या हस्ते लॉकर प्रणालीचे उद्घाटन

विरार, ता. ६ (बातमीदार) : वसईमधील गार्डवेल इंडस्ट्रीजच्या ऑटोमेटेड सेफ डिपॉझिट लॉकर प्रणालीचे वसई विकास सहकारी बँकेच्या मुख्यालयात बँकेचे अध्यक्ष आशय राऊत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. बँका, पतपेढ्या व नागरिक यांना ही सुविधा पाहण्यासाठी ३० मेपर्यंतचा वेळ असणार आहे.

ही लॉकरप्रणाली पूर्णपणे स्वयंचलित व संगणकीकृत असून ग्राहकांना अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देणारी आहे. बायोमेट्रिक प्रमाणीकरण, पिनआधारित प्रवेश आणि प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे लॉकरचा वापर अधिक विश्वासार्ह बनल्याचे बँकेने सांगितले. कमी जागेत जास्त लॉकरीची सुविधा या प्रणालीमुळे उपलब्ध असेल. या प्रणालीमुळे ग्राहकांना २४ तास सेवा मिळणार आहे. या लॉकर प्रणालीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी वसई विकास बँकेचे अध्यक्ष आशय राऊत, उपाध्यक्ष शिरीष राऊत, बँकेचे कार्यकारी अधिकारी दिलीप ठाकूर, गार्डवेल इंडस्ट्रीजचे विल्यम तुस्कानो तसेच वसई विकास बँकेचे संचालक आणि कर्मचारी उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी बोलताना आशय राऊत यांनी सांगितले, की बँक आता प्रगती करत असतानाच अशा सुविधा उपलब्ध झाल्याने बँकेबरोबरच त्याचा फायदा ग्राहकांनाही होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VAIBHAV SURYAVANSHI: ११ चेंडूत अर्धशतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी फायनलमध्ये 'असा' झाला आऊट; नक्की काय घडलं?

ChatGPT मध्ये मोठं अपडेट! आता वेळेवर मिळणार सगळे अलर्ट; जाणून घ्या कसं काम करतंय हे फीचर? आहे तुमच्या फायद्याचं

नॅशनल हायवे अन् एक्सप्रेस वेवर हवामानानुसार बदलणार वेग मर्यादा; उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान

BEST Bus: 'नीट' परीक्षेसाठी 'बेस्ट'ची विशेष सेवा; २४ मार्गांवर ६० अतिरिक्त बसेस, दिवसभरात १८० फेऱ्यांचे नियोजन

Akole Leopard Attack: लेक किंचाळली अन् वडील धावले! बिबट्याच्या तावडीतून ४ वर्षीय अवनीची सुटका; अकोल्यातील थरारक घटना..

SCROLL FOR NEXT