मुंबई

कल्याणमध्ये १०७ किलो गांजा जप्त

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : कल्याणमधील खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थविरोधी मोहिमेदरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १०७ किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी मुलुंड, ठाणे आणि भिवंडी येथील तिघांना अटक केली असून त्यांच्याविरोधात यापूर्वीही अमली पदार्थसंबंधित गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे. न्यायालयाने आरोपींना ९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशान्वये अमली पदार्थविरोधी पथक गस्तीवर असताना ४ मे रोजी दुपारी २.०५ वाजण्याच्या सुमारास वाडेघर येथील डम्पिंग ग्राउंड परिसरात तिघे संशयास्पद हालचाल करताना आढळले. त्यांच्याजवळ हिरव्या-पांढऱ्या रंगाच्या गोण्या असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी चौकशीसाठी पुढे जाताच तिघांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत त्यांना ताब्यात घेतले. अटक केलेल्या आरोपींमध्ये भिवंडीतील वसीम नुरूजमा खान ऊर्फ पिला (३०), ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील दिनेशकुमार सजीवन सरोज (२७) आणि मुलुंडमधील मोहित मेवालाल वर्मा (२०) यांचा समावेश आहे. आरोपींच्या अंगझडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून १०७ किलो ५० ग्रॅम गांजा, १० हजार ५०० रुपये रोख रक्कम; तसेच ४१ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल असा एकूण २१ लाख ९१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वीही गुन्ह्याची नोंद
तपासादरम्यान आरोपींविरोधात यापूर्वीही अमली पदार्थप्रकरणी गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे. वसीम खान याला घाटकोपर युनिट-७ ने यापूर्वी अटक करून त्याच्याकडून अडीच किलो चरस जप्त केला होता. तर दिनेशकुमार सरोज याच्याकडून याच पथकाने १८२० किलो गांजा जप्त केल्याची नोंद आहे. तसेच मोहित वर्मा यालाही मुलुंड पोलिसांनी एनडीपीएस प्रकरणात अटक केली होती. ही संयुक्त कारवाई परिमंडळ ३ कल्याण विशेष पथक आणि खडकपाडा पोलिसांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

७०व्या वर्षी नेत्याचं २० वर्षीय तरुणीशी चौथं लग्न, दुसऱ्या पत्नीची पोलिसात धाव; ११ अपत्यांचा बाप, मुलं न झाल्यानं तिसरीला घटस्फोट

IND vs PAK Match Ban: मोठी बातमी! पाकिस्तानी खेळाडू भारतात येऊ शकतील, पण...; भारत-पाकिस्तान सामन्यांवर सरकारचा महत्त्वाचा निर्णय

अवघ्या 24 तासांत बदलणार कन्या राशीसकट आणखी दोन राशींचं नशीब ! बुधाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मिळणार पैसाच पैसा

T20 Mumbai League: श्रेयस अय्यर, अंगकृश रघुवंशी एकाच संघात! आकाश पारकर १२ लाख रुपयांच्या सर्वोच्‍च बोलीसह करारबद्ध

Tata Motors टाटा एस गोल्ड+ XL लाँच; अधिक पेलोड, अधिक कमाई, उद्योजकांसाठी नवे संधीचक्र

SCROLL FOR NEXT