मुंबई

काँग्रेसने रोखला वाडा- मनोर महामार्ग

CD

वाडा-मनोर महामार्गावर उद्रेक
काँग्रेसच्या आंदोलनाने अर्धा तास वाहतूक ठप्प

वाडा, ता. ६ (बातमीदार) ः वाडा-मनोर महामार्गावरील वरले गावालगतच्या रस्त्यावर खोदकामामुळे रमेश पवारचा अपघाती मृत्यू झाला होता. या घटनेतील पीडितांना नुकसानभरपाई देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने वाडा-मनोर महामार्गावर बुधवारी (ता. ६) आंदोलन करण्यात आले.
वरले गावालगतच्या बांधकामाजवळ सुरक्षेच्या अनुषंगाने बॅरिकेड्स नसल्याने रमेश पवारची दुचाकी खड्ड्यात पडली होती. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होऊन रमेशचा मृत्यू झाला. या घटनेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांनी केली. या वेळी जवळपास अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला. या वेळी आंदोलकांची पोलिस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांनी घटनास्थळी भेट घेतली. तसेच तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ईगल कंपनीचे अधिकारी यांच्यासोबत तहसीलदार कार्यालयात बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले.
------------------------
वाहनांच्या रांगा
आंदोलकांनी कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच बांधकाम कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या वेळी आंदोलनामुळे काही काळासाठी वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वरुणराजा तर विदर्भात सूर्य कोपणार; पुढचे २ दिवस धोक्याचे

SRH vs PBKS Live: चुकीला माफी नाही! सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांची दादागिरी; पंजाब किंग्सला महागात पडला ढिसाळपणा

Sunetra Pawar: मोठा राजकीय निर्णय! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा; महाराष्ट्रात फुलफोकस एंट्री

विजयला रोखण्यासाठी कट्टर शत्रू एकत्र येणार? तामिळनाडुत राजकीय भूकंपाची शक्यता, DMK अन् AIDMKच्या आघाडीची चर्चा

SRH vs PBKS Live: ३ झेल अन् १ स्टम्पिंगची संधी गमावली... पंजाबच्या खेळाडूंनी युझवेंद्र चहलवर रडण्याची वेळ आणली Video Viral

SCROLL FOR NEXT