मुंबई

योजना ९५ टक्के पूर्ण; मात्र नागरिकांना लाभ नाही

CD

भूमिगत गटार योजना वादात
अठरा वर्षांत अवघ्या १,८०० इमारतींची जोडणी

भाईंदर, ता. ६ (बातमीदार) ः मिरा-भाईंदर शहरातील इमारतींचे सांडपाणी वाहून नेण्यासाठी महापालिकेने भूमिगत गटार योजना ९५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे; पण गेल्या १८ वर्षांत शहरातील २५ हजार इमारतीपैकी १,८०० इमारतींच्या मलवाहिन्यांची जोडणी झाली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना लाभ मिळाला नसल्याने गटार योजना वादात सापडण्याची शक्यता आहे.
२००८ मध्ये भूमिगत गटार योजना सुरू झाली. तर २००९ पासून शहरातील नागरिकांकडून पालिका दरवर्षी मलप्रवाह सुविधा लाभ कर वसूल करत आहे. गेल्या १७ वर्षांत १,५०० कोटींचा कर वसूल झाला आहे. योजनेतील भूमिगत मलवाहिन्यांना शहरातील सर्व रहिवासी इमारतींचे सांडपाणी वाहून नेणाऱ्या मलवाहिन्या जोडणी केली जाणार आहे. महापालिका प्रशासनाने ९५ टक्के योजना पूर्ण झाला असल्याचा दावा केला आहे; परंतु शहरातील २५ हजारांहून अधिक रहिवासी इमारतींपैकी प्रशासनाने १८ वर्षांत केवळ १,८२६ इमारतींच्या मलवाहिन्या योजनेशी जोडल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, अनेक रहिवासी सोसायट्यांनी मलवाहिन्यांची जोडणी करण्यासाठी पालिकेला २५ हजारांचे शुल्क दिले आहे. तरीदेखील प्रशासनाने त्यांच्या मलवाहिन्या योजनेशी जोडल्या नसल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे.
------------------------------------
महासभेत भांडाफोड
महापालिकेने ८०० कोटींपेक्षा अधिकचा खर्च योजनेवर केला आहे. तर लोकांकडून १,५०० कोटींचा कर वसूल केला असल्याची बाब बुधवारी (ता. ६) पालिकेच्या महासभेत काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत यांनी उघड केली आहे. तसेच प्रशासनाला योजना पूर्ण करायची नसेल तर लोकांकडून मलप्रवाह सुविधा लाभ कर घेणे बंद करा, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
---------------------
विशेष बैठकीची मागणी
महापौर डिंपल मेहता यांच्यासह सभागृहातील सर्वच नगरसेवक भूमिगत गटार योजनेवर नाराज आहेत. त्यामुळे यासंदर्भात आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली भूमिगत गटार योजनेचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक घेण्यात यावी, असे आदेश महापौरांनी महासभेत दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: कायदाच अस्तित्वात नाही, तरी कारवाई का? कोर्टानं राज्य सरकारला ठोठावला दंड

IPL 2027: रिषभ पंतने LSG संघानं ट्रेड केल्यानंतर लिहिला फक्त तीन शब्दांचा मेसेज! पाहा काय केली पोस्ट

Latest Marathi News Live Update : अमरावतीत मान्सूनच्या पहिल्याच पावसात नालेसफाईची पोलखोल

Mumbai News: बेस्टला पालिकेची मदत, ताफ्यात २७५ नव्या ई बस, १७० कोटी पुनर्विकासाचे मिळणार

Mumbai News: कारवाई रोखण्यासाठी कट, न्यायाधीशांचीच मारली सही; न्यायालयाचा धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT