मुंबई

अमली पदार्थमुक्त जिल्ह्यासाठी ‘पण’

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ :  जिल्ह्याला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी केवळ एका विभागाने नाही, तर सर्वच शासकीय विभागांनी समन्वयाने आणि प्रभावीपणे काम करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात झालेल्या ''जिल्हा नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर'' समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी या सर्व यंत्रणांनी एकमेकांशी माहितीची देवाणघेवाण करून संयुक्त कारवायांचा वेग वाढवावा. तस्करीच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यावा, असे स्पष्ट निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांनी पोलिस, महसूल, आरोग्य आणि उत्पादन शुल्क विभागाला दिले.
बैठकीला पोलिस निरीक्षक राजेंद्र निकम, समीर शेख, सहाय्यक निरीक्षक लहू सातपुते यांच्यासह औद्योगिक सुरक्षा, अन्न व औषध प्रशासन, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद समाज कल्याण, कृषी, केंद्रीय वस्तू व सेवा कर, टपाल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ठाणे जिल्ह्याला अंमली पदार्थमुक्त करण्याच्या दिशेने जिल्हा प्रशासनाने उचललेले हे एक निर्णायक पाऊल असून, भविष्यातील रणनीतीवरही या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

शाळा, महाविद्यालय परिसरात जनजागृती
पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचविण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयीन परिसरामध्ये जनजागृती मोहिमांचे काटेकोर नियोजन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच, जिल्ह्यातील व्यसनमुक्ती केंद्रांना आवश्यक ते तांत्रिक सहकार्य आणि मार्गदर्शन प्रशासनामार्फत उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही माने यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वरुणराजा तर विदर्भात सूर्य कोपणार; पुढचे २ दिवस धोक्याचे

SRH vs PBKS Live: चुकीला माफी नाही! सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांची दादागिरी; पंजाब किंग्सला महागात पडला ढिसाळपणा

Sunetra Pawar: मोठा राजकीय निर्णय! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा; महाराष्ट्रात फुलफोकस एंट्री

विजयला रोखण्यासाठी कट्टर शत्रू एकत्र येणार? तामिळनाडुत राजकीय भूकंपाची शक्यता, DMK अन् AIDMKच्या आघाडीची चर्चा

SRH vs PBKS Live: ३ झेल अन् १ स्टम्पिंगची संधी गमावली... पंजाबच्या खेळाडूंनी युझवेंद्र चहलवर रडण्याची वेळ आणली Video Viral

SCROLL FOR NEXT