अंबरनाथ, ता. ६ (वार्ताहर) : शहराच्या पश्चिम परिसरात छबिला पाणपोई परिसरात एका कारवर चढून उड्या मारणाऱ्या तरुणाला खाली उतरवल्याचा राग मनात धरून चार व्यक्तींनी एका शिक्षकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात शिक्षकाच्या कारची तोडफोड करण्यात आली असून, यात सुमारे पावणेदोन लाखांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. ५) चार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय फेरू धाडवड (वय ४०) हे शिक्षक असून ते अंबरनाथ पश्चिम भागात राहतात. मंगळवारी रात्री ९ वाजून २० मिनिटांच्या सुमारास ते त्यांचे मित्र सतीश काकुळते यांच्यासह कार (क्र. एमएच १५ एचयू ०४२९)ने कोहोजगाव नाका येथून के. बी. रोडच्या दिशेने जात होते. या वेळी परिसरात गैबनशहा उरुसानिमित्त संदलची मिरवणूक सुरू होती. कार छबिला पाणपोईजवळ आली असता, गर्दीतील एका तरुणाने त्यांच्या कारच्या टपावर चढून उड्या मारण्यास सुरुवात केली. धाडवड यांनी त्याला खाली उतरवल्याने राग मनात धरून त्या तरुणासह त्याच्या इतर तीन साथीदारांनी त्यांना घेरले. या टोळक्याने त्यांना मारहाण करत शिवीगाळ व धमकी दिली. या हल्लेखोरांनी कारचे टप, समोरील काच आणि मागील बाजूची तोडफोड केली. या प्रकरणाचा पोलिस उपनिरीक्षक संभाजी काळे अधिक तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.