उल्हासनगर, ता. ६ (बातमीदार) : उल्हासनगरातील श्रीराम चौक परिसरात असलेल्या एस. बँकेच्या एटीएममधून बॅटऱ्या चोरी करणाऱ्या हॅल्मेटधारी चोरट्याला विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, वीज गेल्यानंतरही बॅटरीवर सुरू असलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेमुळे हा प्रकार उघडकीस आला.
एटीएम मशीन सुरळीत सुरू राहावी, यासाठी तेथे तीन बॅटऱ्या बसवण्यात आल्या होत्या. सोमवारी रात्री वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर एका हॅल्मेटधारी तरुणाने एटीएममध्ये प्रवेश करून तिन्ही बॅटऱ्या चोरी केल्या; मात्र एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरे बॅटरीवर सुरू असल्याने आरोपीची संपूर्ण हालचाल कॅमेऱ्यात कैद झाली.
याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांच्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी अजय शर्मा याला अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या तिन्ही बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
अशोक कोळी यांनी सांगितले, की वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर बँका आणि मोठ्या आस्थापनांमधील सीसीटीव्ही यंत्रणा बॅटरीवर कार्यरत राहतात. याच यंत्रणेमुळे आरोपीला पकडण्यात यश आले. एटीएममधील बॅटऱ्या चोरी करण्याचा हा पहिलाच प्रकार असावा, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.