मुंबई

आर्थिक संकटात कंत्राटी कर्मचारी

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : जिल्ह्यात ग्रामीण भागात ‘हर घर नल से जल’ उपक्रम राबविणाऱ्या जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अनेक महिन्यांपासून वेतन रखडले आहे. डिसेंबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीतील मानधन न मिळाल्याने कर्मचारी आर्थिक संकटात आहेत. घर चालवायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
ठाणे जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. जलजीवन मिशनमधील पाच महिन्यांचे, तर स्वच्छ भारत मिशनमधील कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपासून मानधन वितरण अनियमित झाल्यामुळे घरभाडे, शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील १६० गावांमध्ये ‘हर घर नल से जल’ उपक्रमांतर्गत घराघरांत नळाद्वारे पाणीपुरवठा पोहोचविण्याचे काम या कर्मचाऱ्यांनी केले आहे. तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय योजना आणि हागणदारीमुक्त गाव मोहीम राबवत ७७७ पैकी ७०० गावे हागणदारीमुक्त करण्यात आली आहेत. असे असतानाही पाच महिन्यांपासून हे कंत्राटी कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणिते कोलमडली आहे.

प्रणालीमुळे विलंब
कर्मचाऱ्यांनी काही संरचनात्मक अडचणींकडेही लक्ष वेधले आहे. मानधनासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूद नसणे, तसेच एसएनए स्पर्श प्रणालीमुळे वेतन जमा होण्यात १५ ते २० दिवसांचा विलंब होणे, या प्रमुख समस्या असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वरुणराजा तर विदर्भात सूर्य कोपणार; पुढचे २ दिवस धोक्याचे

SRH vs PBKS Live: चुकीला माफी नाही! सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांची दादागिरी; पंजाब किंग्सला महागात पडला ढिसाळपणा

Sunetra Pawar: मोठा राजकीय निर्णय! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा; महाराष्ट्रात फुलफोकस एंट्री

विजयला रोखण्यासाठी कट्टर शत्रू एकत्र येणार? तामिळनाडुत राजकीय भूकंपाची शक्यता, DMK अन् AIDMKच्या आघाडीची चर्चा

SRH vs PBKS Live: ३ झेल अन् १ स्टम्पिंगची संधी गमावली... पंजाबच्या खेळाडूंनी युझवेंद्र चहलवर रडण्याची वेळ आणली Video Viral

SCROLL FOR NEXT