मुंबई

कामगारांच्या फसवणुकीने यंत्रमाग मालक चिंतेत

CD

भिवंडी, ता. ६ (बातमीदार) : लग्नसराई आणि मुलांच्या शाळेला सुट्ट्या असल्याने घरगुती कामानिमित्ताने दरवर्षी एप्रिल-मेमध्ये भिवंडीतील यंत्रमाग कामगार आपापल्या गावी जातो. त्यामुळे शहर व परिसरात यंत्रमागावर काम करण्यासाठी कामगारांचा तुटवडा भासतो. अशावेळी काही कामगार आपल्या मजुरीचे दर वाढवून काम करतात, तर काहीजण आपले काम टिकून राहावे, याकरिता मालकाकडून आगाऊ रक्कम घेतात; मात्र अनेक कामगार मालकाकडून हजारो रुपये आगाऊ घेत कामावर न येता गावी निघून जात आहे. वारंवार शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने यंत्रमाग मालकवर्ग दुहेरी संकटात सापडला आहे.

भिवंडीतील यंत्रमागमालक कामगारांच्या तुटवड्याने त्रस्त आहेत. या परिस्थितीचा फायदा घेऊन, कामगार आपल्या मालकांची फसवणूक करत आहेत. बहुतेक कामगार उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि इतर राज्यांमधून येतात. इराण-इस्राईल युद्धामुळे शहराही कामगारांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. यंत्रमागावर अनियमित काम, गॅस सिलिंडरची टंचाई, शाळांना उन्हाळी सुट्ट्या, लग्नसराई आणि कापणीच्या हंगामामुळे हजारो मजूर आपापल्या गावी परतले आहेत. त्यामुळे कामगारांचा तुटवडा भासू लागला आहे. दरम्यान, आपले यंत्रमाग कायम सुरू राहावेत, याकरिता मालकवर्ग नवीन कामगारांना घेऊन काम सुरू ठेवत आहेत; परंतु आगाऊ रक्कम मिळाल्यानंतरही कामावर न येता यंत्रमाग कामगार गैरफायदा घेत आहेत.

मालक कामगारांच्या शोधात
शहरातील यंत्रमाग उद्योग संकटाचा सामना करीत आहे. मंदीमुळे आधीच त्रस्त असलेले यंत्रमाग मालक आता कामगारांच्या कमतरतेमुळे हवालदिल झाले आहेत. त्यामुळे विविध यंत्रमाग कारखान्याच्या समूहाच्या ठिकाणी जवळपास प्रत्येक भागात काही यंत्रमाग बंद झाले आहेत. आपले कारखाने चालू ठेवण्यासाठी मालक रात्रंदिवस कामगारांचा शोध घेत आहेत.

रोखीने व्यवहार केल्याने फटका
नोटबंदीनंतर केंद्र सरकारने विविध कायदे लागू करून कामगारांच्या हितासाठी अंमलबजावणी केली. त्यानुसार कामगारांना त्यांचा पगार बँक खात्यावर जमा होताे. तसेच इतर व्यवहारदेखील त्याच बँकेतील खात्यावर केले जातात; परंतु शहरातील अनेक कापड व्यापारी आणि यंत्रमाग मालकांनी काही महिने कामगारांचा पगार बँकेद्वारे केला. त्यानंतर कामगारांना रोखीने व्यवहार केल्याने आज यंत्रमाग मालकांना आर्थिक फटका बसत आहे, असे एका कापड व्यावसायिकाने सांगितले.

हजारो रुपयांची फसवणूक
यंत्रमाग चालक रणजित सिंग आणि शीतला प्रसाद मिश्रा यांनी सांगितले, की शहरात अनेक यंत्रमाग मालक, तर काहींनी यंत्रमाग भाड्याने घेऊन ते चालविणारे आहेत. अनेक कामगारांनी १५ हजार ते २० हजार रुपये आगाऊ घेतले आणि ते कामावर आलेच नाहीत. वारंवार शोध घेऊनही ते सापडलेले नाहीत. इतर मालकांचीही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे यंत्रमाग चालू ठेवावेत की बंद करावेत, याबाबत आपण संभ्रमात आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Match Ban: मोठी बातमी! पाकिस्तानी खेळाडू भारतात येऊ शकतील, पण...; भारत-पाकिस्तान सामन्यांवर सरकारचा महत्त्वाचा निर्णय

अवघ्या 24 तासांत बदलणार कन्या राशीसकट आणखी दोन राशींचं नशीब ! बुधाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मिळणार पैसाच पैसा

T20 Mumbai League: श्रेयस अय्यर, अंगकृश रघुवंशी एकाच संघात! आकाश पारकर १२ लाख रुपयांच्या सर्वोच्‍च बोलीसह करारबद्ध

Tata Motors टाटा एस गोल्ड+ XL लाँच; अधिक पेलोड, अधिक कमाई, उद्योजकांसाठी नवे संधीचक्र

Vijay Thalapathy Govt Formation: तामिळनाडुत नवा ट्विस्ट! विजयच्या सत्तास्थापनेच्या दाव्याला राज्यपालांनी टाकलं होल्डवर; 'टीव्हीके'ला दिला सल्ला

SCROLL FOR NEXT