मुंबई

विकसित भारतात विकसक आणि कंत्राटदारांचे योगदान असेल

CD

विकसित भारतात विकसक आणि कंत्राटदारांचे योगदान असेल
मंत्री ॲड. आशीष शेलार यांचे प्रतिपादन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः १९४१ मध्ये स्थापन झालेल्या ‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे मुंबई केंद्र यंदा आपले पन्नासावे वर्ष साजरे करीत आहे. यानिमित्ताने व नियुक्त कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या वेळी बोलताना शेलार यांनी ‘विकसित भारत २०४७’मध्ये विकसक आणि कंत्राटदार यांचा वाटा महत्त्वाचा असेल, असे नमूद केले.

या समारंभात महेश एम. मुद्दा यांनी ‘बीएआय’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष, तर सुनील जी. मथरेजा यांनी ‘बीएआय’, मुंबई केंद्राचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या नव्या कार्यकारिणीसह पदभार स्वीकारला. शेलार यांनी या वेळी एआयच्या क्षेत्रात जी आमूलाग्र प्रगती होत आहे, त्यात सहभागी होत विकसक (बिल्डर) आणि कंत्राटदारांनी सरकारबरोबर काम करावे, असेही आवाहन केले. सरकार याबाबतीत सकारात्मक आहे. तुम्हीही पुढे या. एआयचा वापर करून कामे अधिक प्रभावी आणि गतिमानतेने होतील आणि त्यामुळे त्याचा अवलंब करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर विकासाची पायाभूत सुविधांमधील कामे करत असताना पर्यावरणावर विशेष लक्ष द्या. पर्यावरणीय संतुलन हा एक आमूलाग्र भाग आहे, हे ध्यानात ठेवा, असेही त्यांनी सांगितले.

------------
पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
या समारंभाला विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योग क्षेत्रातील नेते, प्रतिष्ठित व्यक्ती आणि बांधकाम क्षेत्रातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी मुद्दा आणि मुथरेजा यांच्यासह नरेंद्र पनानी यांनी उपाध्यक्ष म्हणून, राकेश शाह यांनी सचिव, शिवशंकर लातुरे यांनी खजिनदार, राजन शाह यांनी सहखजिनदार, राजेंद्र पै यांनी सहखजिनदार म्हणून कार्यभार स्वीकारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वरुणराजा तर विदर्भात सूर्य कोपणार; पुढचे २ दिवस धोक्याचे

SRH vs PBKS Live: चुकीला माफी नाही! सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांची दादागिरी; पंजाब किंग्सला महागात पडला ढिसाळपणा

Sunetra Pawar: मोठा राजकीय निर्णय! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा; महाराष्ट्रात फुलफोकस एंट्री

विजयला रोखण्यासाठी कट्टर शत्रू एकत्र येणार? तामिळनाडुत राजकीय भूकंपाची शक्यता, DMK अन् AIDMKच्या आघाडीची चर्चा

SRH vs PBKS Live: ३ झेल अन् १ स्टम्पिंगची संधी गमावली... पंजाबच्या खेळाडूंनी युझवेंद्र चहलवर रडण्याची वेळ आणली Video Viral

SCROLL FOR NEXT