मुंबई

मोरोशीतील भैरवगडाचा ऐतिहासिक वारसा धोक्यात

CD

बाळासाहेब भालेराव : सकाळ वृत्तसेवा
मुरबाड, ता. ६ : तालुक्यातील मोरोशी गावाजवळ सह्याद्रीच्या कुशीत वसलेला ऐतिहासिक भैरवगड सध्या दुर्लक्षित अवस्थेत आहे. त्याच्या जतन व विकासासाठी सरकारने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ, गिर्यारोहक आणि इतिहासप्रेमींमधून जोर धरू लागली आहे.
उंच सुळक्यासारख्या रचनेमुळे प्रसिद्ध असलेला भैरवगड हा शिवकालीन दुर्ग रणनीतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. इतिहासकारांच्या मते, शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि पहारा देण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. किल्ल्यावर असलेल्या गुहा, पाण्याच्या टाक्या आणि कोरलेल्या पायवाटा आजही त्याच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देतात. मात्र, सध्या किल्ल्याची अवस्था चिंताजनक बनली आहे. किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गाची दुरवस्था, सुरक्षाव्यवस्थेचा अभाव, माहितीफलक नसणे; तसेच संवर्धनासाठी कोणतीही ठोस योजना नसल्याने पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात येथे जाणे धोकादायक ठरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे निवेदने देऊनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. योग्य पायाभूत सुविधा, रस्ता, सुरक्षारक्षक, मार्गदर्शक फलक तसेच किल्ल्याच्या दुरुस्तीची कामे हाती घेतल्यास भैरवगड हे महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकते, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे. इतिहासतज्ज्ञांच्या मते, भैरवगडासारख्या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन केल्यास इतिहास जपला जाईलच, शिवाय स्थानिक आदिवासी बांधवांसाठी रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील. त्यामुळे सरकारने या दुर्गाच्या संवर्धनाकडे गांभीर्याने लक्ष देत विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी होत आहे.

ठाणे आणि पुणे हे दोन्ही जिल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ लगत असल्याने भैरवगडावर मुंबई आणि उपनगरांतील पर्यटक व गिर्यारोहक सहज पोहोचू शकतात. सरकारने विशेष निधी उपलब्ध करून दिल्यास या भागातील आदिवासी बांधवांच्या रोजगाराला चालना मिळेल आणि इतिहासाचा अमूल्य ठेवा जतन होईल.
- शंकर हेमा सोंगाळ, माजी सरपंच, वाकलवाडी

मुरबाड : भैरवगडावर जाणारे गिर्यारोहक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ARG vs Austria : लिओनेल मेस्सीचा विश्वविक्रमी गोल पाहिलात का? ज्याने अर्जेंटिनाला Fifa World Cup च्या पुढील फेरीत पोहोचवले Video Viral

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

Argentina vs Austria : ५६ वर्षानंतर चमत्कार झाला... लिओनेल मेस्सीचा World Cup मध्ये दरारा, ९६ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात तिघांनाच हा पराक्रम जमलाय...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

SCROLL FOR NEXT