मुंबई

वनसंपदेवर घाला घालण्याचा प्रयत्न

CD

वज्रेश्वरी, ता. ६ (बातमीदार) : निसर्गाचा अनमोल ठेवा असलेल्या वज्रेश्वरी-अकलोली परिसरातील बुद्ध बाबा मार्गावर पर्यावरणाच्या ऱ्हासाचा प्रकार उघडकीस आला आहे. मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना सुखद गारवा देणाऱ्या वनसंपदेवर काही व्यक्तींकडून जाणीवपूर्वक घाला घातला जात असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाला या प्रकाराची माहिती मिळताच वज्रेश्वरीतील वनपाल विकास शेलार यांनी बुधवारी (ता. ६) पाहणी करत पंचनामा केला.

वज्रेश्वरी-अकलोली परिसरात मोह, जांभूळ, खैर, पळस यांसारखी अनेक दुर्मिळ जंगली झाडे आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काही झाडांच्या बुंध्याजवळ सुकी लाकडे जमा करून त्यांना आग लावण्याचा प्रकार सुरू आहे. या आगीच्या उष्णतेमुळे झाडे हळूहळू वाळून जात असून, ती नष्ट करण्याचा प्रयत्न असल्याचा संशय पर्यावरणप्रेमी वैभव पवार यांनी व्यक्त केला आहे. या परिसरातील एक मोठे वृक्ष कुऱ्हाडीने तोडण्याचा प्रयत्न मंगळवारी (ता. ५) प्रत्यक्षदर्शींनी पाहिल्याने या प्रकाराची गंभीरता वाढली आहे.

निसर्गरम्य वातावरण नष्ट करण्यामागे नेमका कोणाचा हात आहे, असा प्रश्न जागरूक नागरिक उपस्थित करत आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि मौल्यवान वृक्षांचे संरक्षण करावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी व नागरिकांकडून होत आहे.

प्रशासनाकडून कठोर उपाय
वज्रेश्वरी-अकलोलीतील वृक्षांना जाणीवपूर्वक हानी पोहोचवण्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. या संदर्भात प्राथमिक माहिती मिळाली असून, वनविभागाकडून तातडीने पाहणी सुरू करण्यात येणार आहे. संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. झाडांच्या बुंध्याजवळ आग लावणे किंवा कुऱ्हाडीने कत्तल करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. या प्रकारामागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. वनविभाग या प्रकरणात कोणतीही हलगर्जीपणा करणार नाही, अशी प्रतिक्रिया वनपरीक्षेत्र अधिकारी पूजा रक्ताटे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT