मुंबई

एपीएमसीत अस्वच्छतेचा विळखा

CD

एपीएमसीत अस्वच्छतेचा विळखा
कांदा-बटाटा-लसूण मार्केटमध्ये दुर्गंधी; आरोग्याला गंभीर धोका
तुर्भे, ता. ६ (बातमीदार) : वाशी येथील एपीएमसीअंतर्गत कांदा, बटाटा आणि लसूण मार्केटमध्ये प्रचंड अस्वच्छता पसरल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कचरा व्यवस्थापनातील ढिसाळपणा आणि साफसफाईकडे दुर्लक्ष यामुळे बाजार परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले असून व्यापारी, हमाल व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
बाजारातील कचराकुंड्या ओसंडून वाहत असून, अनेक ठिकाणी कचरा बाहेरच साचलेला दिसतो. या साचलेल्या कचऱ्यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. विशेषतः सकाळच्या लिलावावेळी परिस्थिती अधिकच बिकट होत असून, नाक मुठीत धरून काम करण्याची वेळ येत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे कांदा व बटाटा लवकर खराब होत असून, खराब मालाची वेळेत विल्हेवाट न लावल्याने तो दोन-तीन दिवस तसाच पडून राहतो. त्यामुळे सडलेल्या मालातून माशा व कीटकांचा प्रादुर्भाव वाढत आहे.
दरम्यान, बाजारात रोज मोठ्या प्रमाणात शेतमाल येतो, मात्र खराब माल वेळेत हटवला जात नाही. त्यामुळे असह्य परिस्थितीत काम करावे लागते, अशी नाराजी व्यापारी मनोहर तोतलानी यांनी व्यक्त केली. हमाल व कामगारांनीही याच समस्येकडे लक्ष वेधले आहे. हजारो लोकांची वर्दळ असलेल्या या बाजारात मूलभूत स्वच्छतेचा अभाव दिसून येत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
चौकट
संसर्गजन्य आजारांचा वाढता धोका
सडलेला माल, साचलेला कचरा आणि माशा-कीटकांचा प्रादुर्भाव यामुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. बाजारातील कामगार, व्यापारी तसेच ग्राहक यांच्या आरोग्यावर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
चौकट
तातडीच्या उपाययोजनांची गरज
कचऱ्याची नियमित विल्हेवाट, विशेष स्वच्छता मोहीम, अतिरिक्त मनुष्यबळ आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई या उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी होत आहे. अन्नपुरवठा साखळीशी संबंधित हा प्रश्न असल्याने प्रशासनाने तत्काळ ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT