मुंबई

आदिवासी समाजाचा सांस्कृतिक जल्लोष

CD

आदिवासी समाजाचा सांस्कृतिक जल्लोष
जगदंबा उत्सवात रंगले कुस्त्यांचे फड

जव्हार, ता. ६ (बातमीदार) : तालुक्यातील बोराळे आणि सारसून या गावांत आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपरा, श्रद्धा आणि लोककलेचा अनोखा संगम असलेला जगदंबा (बोहाडा) उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. शनिवार (ता. २)पासून मंगळवार (ता. ५) पर्यंत पार पडलेल्या या उत्सवात कुस्त्यांचा फडही रंगला. आदिवासी समाजासाठी महत्त्वाच्या असलेल्या या यात्रेत सांस्कृतिक जल्लोषही पाहण्यास मिळाला.

आदिवासी समाजाच्या पारंपरिक वेशभूषा, रंगीबेरंगी मुखवटे, संबळ, ढोल-ताशे, तारपा आणि स्थानिक वाद्यांच्या गजरात गाव दुमदुमून गेले होते. युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी सामूहिक नृत्य सादर करीत आदिवासी संस्कृतीचे जिवंत दर्शन घडवले. उत्सवादरम्यान सादर करण्यात आलेल्या विविध सोंगांमधून देव-देवता, लोकपरंपरेतील पात्रे तसेच सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडण्यात आले.

आदिवासी समाजाच्या बोहाडा उत्सवाची परंपरा तीन रात्री चालणाऱ्या कार्यक्रमांमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरते. पहिल्या रात्री ‘थाप’, दुसऱ्या रात्री ‘धाकला’ आणि तिसऱ्या रात्री ‘मोठा बोहाडा’ साजरा करण्यात आला. टेंभ्याच्या प्रकाशात, संबळ आणि सनईच्या सुरावटीत देवतांचे मुखवटे धारण केलेल्या सोंगांचे सादरीकरण रात्रभर सुरू होते. कागदाचा लगदा, उंबर व सागाच्या लाकडापासून तयार केलेले मुखवटे ही या परंपरेची खास ओळख मानली जाते.
उत्सवाच्या अखेरीस जगदंबा अंबिका मातेची महापूजा करण्यात आली. त्यानंतर मिरवणूक काढत भक्तांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवला. सोंग धारण केल्यानंतर दैवी शक्ती अंगात संचारते, असा स्थानिकांचा दृढ विश्वास असल्याचे या वेळी ग्रामस्थांनी सांगितले.
या उत्सवाच्या माध्यमातून आदिवासी समाजाची एकजूट, सांस्कृतिक ओळख आणि परंपरांचे संवर्धन अधोरेखित झाले असून, अशा लोकपरंपरांना शासनस्तरावर प्रोत्साहन मिळावे, अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात आली.
-------------------------
अस्मितेचे प्रतीक
दरम्यान, पारंपरिक कुस्ती स्पर्धाही मोठ्या उत्साहात पार पडली. स्थानिक तसेच परिसरातील पैलवानांनी यात सहभाग घेतला. या स्पर्धेला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली. गावातील ज्येष्ठांनी बोहाडा हा आदिवासी अस्मितेचा प्रतीक असल्याचे सांगत आधुनिकतेच्या प्रभावातही ही परंपरा टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक तरुणांचा पुढाकार कौतुकास्पद असल्याचे नमूद केले. गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या या परंपरेचे जतन गावपातळीवर होत असल्याने आदिवासी समाजाचा सांस्कृतिक वारसा जिवंत राहिल्याची भावना व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT