मुंबई

राज्यात डायलिसिसच्या संख्येत मोठी वाढ

CD

राज्यात डायलिसिस सेवेत मोठी वाढ

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : राज्यातील सरकारी आरोग्य व्यवस्थेत डायलिसिस सेवेत गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. जिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, महिला रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालये अशा ६६ रुग्णालयांत ही सुविधा उपलब्ध असून, ४१२ डायलिसिस मशीनद्वारे सेवा दिली जाते. यामुळे मूत्रपिंडाच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२०-२१ पासून डायलिसिस सत्रांची संख्या सातत्याने वाढत गेली असून, २०२५-२६ मध्ये (डिसेंबर २०२५ अखेर) ही संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. यासाठी डॉक्टर, परिचारिका व तंत्रज्ञ यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, करार तत्त्वावर नेफ्रोलॉजिस्टची नियुक्तीही करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य यंत्रणेने डायलिसिस सेवेत केलेली ही वाढ आरोग्य क्षेत्रातील सकारात्मक बदलाचे प्रतीक मानली जात आहे. येत्या काळात ही सेवा अधिक व्यापक करण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
...
वर्षनिहाय वाढ
वर्ष डायलिसिस संख्या
२०२०-२१ ६६,७७०
२०२१-२२ ७१,५५१
२०२२-२३ ९३,३६८
२०२३-२४ १,०२,०८०
२०२४-२५ १,२२,६७९
२०२५-२६ १,४१,१७४ (डिसेंबर २०२५ अखेर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय सत्तेपासून दूर राहिला तर कोण मारणार बाजी? स्टालिन फिरवू शकतात गेम, तर राज्यपालांकडे शेवटचा पर्याय

IPL 2026 Point Table: सनरायझर्स हैदराबादचा विजय अन् प्ले ऑफच्या शर्यतीत मोठी उलथापालथ; कूपर कॉनलीचे शतक व्यर्थ

llegal Mining Crackdown: धावत्या जेसीबीला लटकून ३ किमी पाठलाग; नायब तहसीलदारांची धाडसी कारवाई

विराटचा एकेकाळचा टीममेट, पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटरचं वयाच्या ३६व्या वर्षी निधन; युवराज म्हणाला, त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम...

Crime: धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून पत्नीसोबत वाजलं; रागाच्या भरात पतीनं स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT