मुंबई

ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी काहीशी अवस्था शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील नागरिकांची झाली. अशातच दिवसेंदिवस तापमानात वाढ झालेली असून तीव्र उष्णतेमुळे धरणाच्या पाणीपातळीत घट होत आहे. तर, दुसरीकडे दोन्ही तालुक्यातील २७ गाव आणि १०३ पाड्यांतील ४२ हजार २७३ कुटुंबांना पाणीटंचाईच्या झळा सोसव्या लागत असून या गावपाड्यांना ३२ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यामध्ये जल जीवन मिशन, नळ पाणीपुरवठा योजना, पूरक नळपाणी पुरवठा योजना, विंधन विहीर, कुपनलिका आदी योजना राबविण्यात येत आहे. तरी देखील पाणीटंचाई ग्रस्त गावपाड्यांच्या संख्येत घट होत नसल्याचे दिसून येत आहे. अशातच ऑक्टोबर २०२५ ते जून या कालावधीत पाणी टंचाईग्रस्त गाव-पाड्यांना टँकरने पाणी पुरवण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येते. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्यावतीने यंदाचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा व त्यासाठी प्रस्तावित उपाययोजनांचा आराखडा तयार केला आहे.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक नियोजन केले असून, पाणीपुरवठ्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणा सतर्क ठेवली आहे. टँकर पुरवठ्याचे नियोजन काटेकोरपणे राबविण्यात येत असून, आवश्यक त्या ठिकाणी तत्काळ उपाययोजना करण्यात येत आहेत.

तालुका गाव पाडे एकूण कुटुंबे टँकर
शहापूर २४ ९९ १२३ ४१,४८७ ३०
मुरबाड ३ ४ ७८६ २

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंगाल-तमिळनाडू निकालांचा महाराष्ट्रात धसका! 'खाती नीट सांभाळा, काम करा नाहीतर...'; फडणवीसांचा मंत्र्यांना कडक इशारा

अमेरिका इराण युद्ध थांबवणार एक पानी करार, दोन्ही देशांचं जवळपास एकमत; ट्रम्प यांच्या मंत्र्यांने केली घोषणा

लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे ‘देवमाणूस’! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता म्हणाला...'त्यांनी माझी भाषा ऐकून...'

Supreme Court order Gokul Milk : 'गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसांत घ्या' सुप्रिम कोर्टाचे आदेश

Latest Marathi News Live Update : मुरबाड-कल्याण मार्गावर पुन्हा अपघात; एसटी-कारच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT