मुंबई

कासा परिसरात संतापाची लाट

CD

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण

कासा परिसरात संतापाची लाट
आमदार रोहित पवारांची रुग्णालयास भेट

कासा, ता. ६ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील कासा पोलिस ठाण्याच्या हद्दीत १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका भोंदू वैद्याने औषध देण्याच्या बहाण्याने स्मशानभूमीत नेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भयंकर प्रकारामुळे परिसरात नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. दरम्यान, पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना आमदार रोहित पवार व उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी रुग्णालयात भेट देत विचारपूस केली.

या घटनेतील पीडित मुलीवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती लक्षात घेऊन वैद्यकीय पथकाकडून आवश्यक उपचार केले जात आहेत. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी रुग्णालयात भेट देत पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. त्यांनी कुटुंबाला धीर देत न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

या वेळी बोलताना आमदार पवार यांनी राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. पीडितेच्या आई आणि बहिणीने दाखवलेल्या धाडसामुळे आरोपीला तत्काळ अटक होऊ शकली, असे त्यांनी नमूद केले. मात्र आरोपीच्या कुटुंबीयांकडून पीडित कुटुंबाला धमकावण्याचे प्रयत्न होत असल्याची माहिती मिळाल्याने या कुटुंबाला तत्काळ पोलिस संरक्षण देण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी गरजेची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दररोज बलात्काराच्या घटना घडत असल्याचे त्यांनी सांगत पोक्सोअंतर्गत १३ हजार प्रकरणे आणि अत्याचाराच्या ५० हजारांहून अधिक प्रकरणांची नोंद असल्याचे नमूद केले. या प्रकरणातील पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
----

नीलम गोऱ्हेंकडून कुटुंबीयांची विचारपूस

या घटनेची गांभीर्याने दखल घेत राज्याच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही कासा उपजिल्हा रुग्णालयात भेट देत पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. त्यांनी डॉक्टर आणि पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली. कुटुंबाला धीर देत आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणाचा जलदगतीने निकाल लावून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची गरज अधोरेखित केली. समाजात वाढणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. ‘शक्ती कायदा’ अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India: वैभव सूर्यवंशीची भारतीय T20 संघात निवड, शुभमन गिलसोबत सलामी; महान क्रिकेटपटूने निवडला संघ

Pune Parvati Crime : पर्वतीतील नऊ वर्षीय मुलीवरीरील अत्याचारप्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

Maharashtra NPS Reform: राज्य शासनाचा मोठा निर्णय: सुधारित एनपीएसमुळे शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांना हमी निवृत्तीवेतन

Pune Crime : नातीसोबत बसलेलो, शेजारच्या महिलेनं अफवा पसरवली; पर्वती प्रकरणातील आजोबाचं कोर्टात उत्तर, ३ दिवस पोलीस कोठडी

Theur Crime : थेऊरमध्ये ६ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक

SCROLL FOR NEXT