मुंबई

ठाणे स्थानकाजवळ पैशांच्या वादातून तरुणाचा खून

CD

ठाणे स्थानकाजवळ पैशांच्या वादातून तरुणाचा खून

अल्पवयीन आरोपी ताब्यात; रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू

ठाणे, ता. ६ : ठाणे रेल्वे स्थानक परिसरात जुन्या पैशांच्या वादातून झालेल्या हल्ल्यात विशाल पटेकर या तरुणाचा मृत्यू झाला असून, अनमोल (१६) हा अल्पवयीन मुलगा जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अनमोल हा त्याचे मित्र विशाल पटेकर, मयूरेश जाधव आणि इतर मित्रांसह ५ मे रोजी रात्री ठाणे रेल्वे स्थानकात आला होता. त्यांच्या एका मित्राला उत्तर प्रदेशला जाणाऱ्या रेल्वेत बसवण्यासाठी ते आले होते. त्यानंतर ते फलाट क्रमांक २ वर जात असताना त्यांना विजय नावाचा ओळखीचा अल्पवयीन मुलगा भेटला.
रेल्वे ट्रॅकजवळ गप्पा मारत असताना जुन्या पैशांच्या वादातून विजय याने अचानक अनमोलची कॉलर पकडून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात अनमोलच्या ओठाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, अनमोलला वाचवण्यासाठी विशाल पटेकर मध्ये पडला असता आरोपीने त्याच्यावरही वार केले. गंभीर जखमी झालेल्या विशाल पटेकर याला तातडीने ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर ठाणे लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

IND vs ENG, T20I: एकट्या वैभव सूर्यवंशीसाठी इंग्लंडमध्ये वेगळी ड्रेसिंग रुम असणार! पण नेमकं यामागे खरं कारण काय?

Latest Marathi News Live Update : शेती उपसा सिंचन योजनेसाठी वीज कनेक्शन मिळावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण

निळावंतीचं रहस्य आणि गुप्त खजिन्याचा शोध! ब्रिटिशकालीन इतिहासावर आधारित 'इंद्रजाल'चा थरारक फर्स्ट लुक आउट

Solapur Water Rights: दुष्काळी १३ तालुक्यांसाठी ३४ वी पाणी संघर्ष परिषद २६ जूनला मंगळवेढ्यात

SCROLL FOR NEXT