मुंबई

आयसीयू खाटा अपुऱ्या

CD

आयसीयू खाटा अपुऱ्या
पालिका रुग्णालयांत वाढत्‍या रुग्‍णसंख्येवरील उपचारांत अडथळे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : कूपर रुग्णालयात आयसीयू बेडअभावी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर महापालिकेच्या रुग्णालयांतील अतिदक्षता सुविधांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाढत्या रुग्णभाराच्या तुलनेत आयसीयू खाटांची संख्या अपुरी पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पालिका प्रशासनाकडून या त्रुटीकडे गांभीर्याने पाहिले जात असून, आगामी प्रकल्पांमध्ये आयसीयू सुविधा वाढवण्याची भूमिका समोर येत आहे. महापालिका रुग्णालयांचे संचालक डॉ. शैलेश मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या एकूण खाटांच्या सुमारे १० टक्के खाटा आयसीयूसाठी राखीव ठेवण्यात येतात. मात्र गंभीर रुग्णांची संख्या जास्त असल्याने या खाटा अपुऱ्या ठरत आहेत. नवीन प्रकल्पांमुळे उपनगरांमध्येही आयसीयू सुविधा उपलब्ध होणार असून, रुग्णांना प्रमुख रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागणार नाही, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी मुंबईत येत असल्याने महापालिका रुग्णालयांवर ताण वाढतो. आयसीयू खाटांची मर्यादित उपलब्धता ही गंभीर रुग्णांसाठी मोठी अडचण ठरत आहे. वेळेवर बेड न मिळाल्याने उपचारात विलंब होऊन जीवितहानीचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

खाटांची चिंताजनक आकडेवारी
महत्त्वाच्या रुग्णालयांतील आयसीयू खाटांचे प्रमाण अत्यल्प आहे. केईएम रुग्णालयात २,२५० खाटांपैकी ३२८, नायरमध्ये १,६२३ पैकी २०६, सायनमध्ये १,७५० पैकी १३९, तर कूपरमध्ये ७०० पैकी केवळ ८१ आयसीयू खाटा उपलब्ध आहेत. या तुलनेत गंभीर रुग्णांसाठी तत्काळ सुविधा मिळणे कठीण ठरत आहे.

सुविधा वाढवण्याची मागणी
कूपरमधील घटनेनंतर आयसीयू आणि एनआयसीयू खाटांची संख्या तातडीने वाढवावी तसेच आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करावी, अशी मागणी जोर धरत आहे. तज्ज्ञांच्या मते, वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांचा विस्तार न झाल्यास ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते.

राज्‍य सरकारच्या रुग्‍णालयांमध्येही बिकट स्‍थिती
दरम्यान, राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्येही अशीच परिस्थिती असून रुग्णांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आयसीयू खाटा वाढवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. राज्यातील ११ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आयसीयू सुविधा वाढवण्यात येत असून, त्यापैकी मुंबईतील जे. जे, कामा, जी. टी. (गोकुळदास तेजपाल) आणि आल्ब्लेस रुग्णालयांमध्येही अतिरिक्त खाटा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Match Ban: मोठी बातमी! पाकिस्तानी खेळाडू भारतात येऊ शकतील, पण...; भारत-पाकिस्तान सामन्यांवर सरकारचा महत्त्वाचा निर्णय

T20 Mumbai League: श्रेयस अय्यर, अंगकृश रघुवंशी एकाच संघात! आकाश पारकर १२ लाख रुपयांच्या सर्वोच्‍च बोलीसह करारबद्ध

Tamil Nadu political drama विजयसमोर पेच! सत्तास्थापनेचा दावा केला पण बहुमतच नाही; राज्यपालांनाही विश्वास नाही, जादुई आकडा कसा गाठणार TVK?

Stray Dog : देगलूरात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याचा उच्छाद; पंधरा ते सोळा नागरिक जखमी, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनाही चावा

चक्क ४९% Gen Z लोक फसवणुकीच्या जाळ्यात अडकता-अडकता वाचले; लिंक्डइनचा इशारा, नोकरी शोधताना 'हे' चुकीचे संकेत ओळखा

SCROLL FOR NEXT