नागरिकांना वेळेत सुविधा देणे गरजेचे
पनवेल महापौर नितीन पाटील यांचे प्रतिपादन
खारघर, ता. ६ (बातमीदार) ः नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत आणि योग्य पद्धतीने मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन केली जाणार नाही, असे पनवेलचे महापौर नितीन पाटील यांनी सांगितले. खारघर परिसरातील विविध नागरी सुविधांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महापौर यांच्या दालनात खारघरमधील नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी (ता. ४) महापौर दालनात पार पडली. या बैठकीत रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, स्वच्छता, पदपथ तसेच उद्यानांच्या देखभालीसंदर्भातील प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला खारघरमधील नगरसेवक तसेच कार्यकारी अभियंता संजय कटेकर उपस्थित होते.
पावसाळा सुरू होणार असल्यामुळे खारघर परिसरातील काही भागांतील अनेक ठिकाणी खड्डेमय रस्ते, अपुरी पाणीपुरवठा व्यवस्था, गटारांची साफसफाई न होणे तसेच पदपथ बंद असून, मॅनहोलवरील झाकणे मोडकळीस आली आहेत. त्यामुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणींचा विशेष उल्लेख नगरसेवकांनी केला. या वेळी महापौर नितीन पाटील यांनी कार्यकारी अभियंत्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक सेक्टरनिहाय अभियंता नियुक्त करून प्रत्यक्ष ठिकाणी सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले. या सर्वेक्षणाच्या आधारे समस्यांचे प्राधान्यक्रम निश्चित करून त्वरित दुरुस्ती आणि विकासकामे हाती घेण्याचेही सांगण्यात आले. नगरसेवकांनीही प्रशासनासोबत समन्वय साधून कामे गतीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
चौकट
नालेसफाईसंदर्भात नाराजी
खारघर सेक्टर २० मधून सेक्टर १२ मार्गे खाडीत जाणाऱ्या नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा, प्लॅस्टिक आणि गाळ साचल्याने पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे रहिवासीयांना दुर्गंधीचा त्रास होत आहे. या नाल्याच्या साफसफाईसंदर्भात पालिकेकडून योग्य पद्धतीने काम केले जात नसल्याची नाराजी नगरसेवकांनी या बैठकीत व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.