मुंबई

ओवळे गावात सिडकोच्या भूसंपादन मोजणीला ग्रामस्थांचा विरोध

CD

ओवळे गावात सिडकोच्या भूसंपादन मोजणीला ग्रामस्थांचा विरोध
उलवे, ता. ६ (बातमीदार): पनवेल तालुक्यातील उलवे परिसरातील ओवळे गावात सिडकोकडून भूसंपादनासाठी सुरू करण्यात आलेल्या मोजणीवरून सोमवारी तणाव निर्माण झाला. कोणतीही पूर्वसूचना न देता सर्वेक्षण सुरू केल्याचा आरोप करत ग्रामस्थ आणि शेतकरी आक्रमक झाले व त्यांनी कामाला तीव्र विरोध केला. संबंधित जमीन कोणत्या प्रकल्पासाठी घेतली जात आहे, त्याचे स्वरूप काय आणि मोबदला किती मिळणार याबाबत स्पष्ट माहिती न दिल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.
आमदार विक्रांत यांनी शेतकऱ्यांची संमती आणि सविस्तर चर्चा केल्याशिवाय काम सुरू करू नये, तसेच पारदर्शक धोरण जाहीर करण्याचे निर्देश दिले. ग्रामस्थांनी विकासाला विरोध नसल्याचे स्पष्ट करत विश्वासात न घेता होणारे निर्णय मान्य नसल्याचा इशारा दिला. सरपंच रुपेश गायकवाड, नंदराज मुंगाजी, सचिन गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय सत्तेपासून दूर राहिला तर कोण मारणार बाजी? स्टालिन फिरवू शकतात गेम, तर राज्यपालांकडे शेवटचा पर्याय

IPL 2026 Point Table: सनरायझर्स हैदराबादचा विजय अन् प्ले ऑफच्या शर्यतीत मोठी उलथापालथ; कूपर कॉनलीचे शतक व्यर्थ

llegal Mining Crackdown: धावत्या जेसीबीला लटकून ३ किमी पाठलाग; नायब तहसीलदारांची धाडसी कारवाई

विराटचा एकेकाळचा टीममेट, पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटरचं वयाच्या ३६व्या वर्षी निधन; युवराज म्हणाला, त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम...

Crime: धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून पत्नीसोबत वाजलं; रागाच्या भरात पतीनं स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT