मुंबई

वस्तू आणि सेवांची निर्यात ८६३.११ अब्ज डॉलरवर

CD

वस्तू आणि सेवांची निर्यात ८६३.११ अब्ज डॉलरवर


नवी दिल्ली, ता. ६ः जागतिक आर्थिक अनिश्चितता असूनही, देशाची वस्तू आणि सेवांची निर्यात २०२५-२६ या वर्षात ४.६ टक्क्यांनी वाढून ८६३.११ अब्ज डॉलर या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचली आहे; आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ही निर्यात ८२५.२६ अब्ज डॉलर इतकी होती. वाणिज्य मंत्रालयाने आज ही आकडेवारी जाहीर केली.
अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात वस्तूंची निर्यात ०.९३ टक्क्यांनी वाढून ४४१.७८ अब्ज डॉलरवर पोहोचली, जी २०२४-२५ मध्ये ४३७.७० अब्ज डॉलर इतकी होती.
‘‘जागतिक अनिश्चितता आणि वस्तूंच्या व्यापारातील आव्हाने असूनही, भारताच्या वस्तूंच्या निर्यातीने आपली वाढीची गती कायम राखली असून, एकूण निर्यातीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे,’’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
सेवांची निर्यात सर्वांत लक्षवेधी ठरली असून, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये सेवांची निर्यात ८.७१ टक्क्यांनी वाढून ४२१.३२ अब्ज डॉलर या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ही निर्यात ३८७.५५ अब्ज डॉलर इतकी होती. ही झालेली मोठी वाढ माहिती तंत्रज्ञान, व्यावसायिक उपाययोजना आणि व्यावसायिक कौशल्ये यांसारख्या सेवांना असलेली जागतिक मागणी वाढत असल्याचे अधोरेखित करते आणि सेवा क्षेत्रामधील देशाची ताकद अधिक बळकट करते, असेही त्या अधिकाऱ्याने पुढे नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय सत्तेपासून दूर राहिला तर कोण मारणार बाजी? स्टालिन फिरवू शकतात गेम, तर राज्यपालांकडे शेवटचा पर्याय

llegal Mining Crackdown: धावत्या जेसीबीला लटकून ३ किमी पाठलाग; नायब तहसीलदारांची धाडसी कारवाई

विराटचा एकेकाळचा टीममेट, पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटरचं वयाच्या ३६व्या वर्षी निधन; युवराज म्हणाला, त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम...

Crime: धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून पत्नीसोबत वाजलं; रागाच्या भरात पतीनं स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?

Nanded Accident : रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक; सेवानिवृत्त सहकार अधिकारी राजेश उल्लेवार यांचे निधन

SCROLL FOR NEXT