मुंबई

महिलांकडून ज्वेलर्स दुकानात हातचलाखी

CD

ठाणे, ता. ६ : ग्राहक बनून ज्वेलर्स दुकानात आलेल्या तीन बुरखाधारी महिलांनी हातचलाखी करत तब्बल तीन लाख २७ हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या लंपास केल्याची घटना मुंब्रा-कौसा परिसरात उघडकीस आली आहे. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा चोरीचा प्रकार समोर आला.
मुंब्रा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौसा येथील ग्लोबल पार्क परिसरात तक्रारदार निजामुद्दीन सिद्दीक थराधरा (वय ३४) यांचे ‘आरास्ता ज्वेलर्स’ नावाचे दुकान आहे. सोमवारी (ता. ४) सायंकाळी ४.४५ च्या सुमारास तीन अनोळखी महिला बुरखा परिधान करून ग्राहक म्हणून दुकानात आल्या. त्यांनी सेल्समनकडे सोन्याच्या बांगड्या पाहण्याची मागणी केली. सेल्समन आसिफ हा महिलांना विविध डिझाइनच्या बांगड्या दाखवत असताना, महिलांनी त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. याचदरम्यान, त्यापैकी एका महिलेने दोन सोन्याच्या बांगड्या बुरख्यात लपवून ठेवल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. काहीही पसंत न आल्याचे सांगत त्या महिलांनी दुकानातून काढता पाय घेतला. महिला गेल्यानंतर बांगड्यांची मोजणी केल्यानंतर दोन बांगड्या कमी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता चोरीचा प्रकार उघड झाला. चोरीला गेलेल्या बांगड्यांची किंमत तीन लाख २७ हजार ६८५ रुपये असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crude Oil Rate: सामान्यांसाठी गुड न्यूज! भारतात कच्च्या तेलाचे दर कोसळले; किती रुपयांनी अन् पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का?

SRH vs PBKS Live: ८ चेंडूंत ३२ धावांचा पाऊस! अभिषेक शर्माच्या फटकेबाजीने मैदान दणाणले... IPL 2026 Orange Cap च्या शर्यतीत टॉपर

Parli Vaijnath News : डॉक्टरांचा हलगर्जीपणा! २२ तास मृत बाळ ठेवले आईच्या गर्भात; कुटुंबियांची डॉक्टरांविरूद्ध पोलिसात तक्रार

ज्या IAS अधिकाऱ्यासाठी ममतांनी PM मोदींचा आदेश धुडकावला, TMC हरताच दिला राजीनामा

Team India: वैभव सूर्यवंशीची भारतीय T20 संघात निवड, शुभमन गिलसोबत सलामी; महान क्रिकेटपटूने निवडला संघ

SCROLL FOR NEXT