मुंबई

सेवा क्षेत्राची वाढ पाच महिन्यांच्या उच्चांकावर

CD

सेवा क्षेत्राची वाढ पाच महिन्यांच्या उच्चांकावर
‘एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस’चा अहवाल

नवी दिल्ली, ता. ६ः एप्रिल महिन्यात देशातील सेवा क्षेत्राने चमकदार कामगिरी केली आहे. या क्षेत्राच्या वाढीचा पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स ५८.८ नोंदवला गेला असून, हा गेल्या पाच महिन्यांतील उच्चांक आहे. या काळात नव्या ऑर्डर आणि उत्पादनात वेगाने वाढ झाली; तसेच पश्चिम आशियातील संकटामुळे कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय पुरवठादारांकडून देशांतर्गत पुरवठादारांकडे आपला कल वळवल्याचे संकेत दिले आहेत, असे ‘एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस’च्या मासिक सर्वेक्षणामध्ये नमूद करण्यात आले आहे.
‘एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस पीएमआय बिझनेस ॲक्टिव्हिटी इंडेक्स’ मार्चमधील ५७.५ वरून एप्रिलमध्ये ५८.८ पर्यंत वाढला असून, ही वाढ गेल्या नोव्हेंबरपासूनची सर्वांत मजबूत विस्तार गती दर्शवते.

या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांच्या मते, स्पर्धात्मक किंमत धोरण, ई-कॉमर्स आणि विशेषतः स्थलांतर व लॉजिस्टिक सेवांसाठी ग्राहकांकडून असलेली जोरदार मागणी यामुळे विक्रीवाढीला चालना मिळाली. भारतीय सेवांसाठीच्या आंतरराष्ट्रीय मागणीची गती काहीशी मंदावली. पश्चिम आशियातील युद्ध आणि देशातंर्गत पर्यटनातील संथगती यामुळे सेवा क्षेत्राचा विस्तार काहीसा खुंटल्याचे कंपन्यांनी नमूद केले.
सेवा पुरवठादार कंपन्यांनी त्यांच्या परिचालन खर्चात पुन्हा एकदा लक्षणीय वाढ झाल्याचे नोंदवले. एप्रिलमध्ये महागाईचा दर काहीसा मंदावला असला, तरीही नोव्हेंबर २०२४ नंतर दिसून आलेल्या सर्वाधिक दरांपैकीच हा एक दर होता. खाद्यतेल, अंडी, मांस आणि भाज्या, गॅस आणि कामगारांवरील खर्च; तसेच गॅसचा तुटवडा या बाबींमुळे खर्चात वाढ झाल्याचे कंपन्यांनी नमूद केले आहे.

भारतीय सेवा कंपन्यांना येत्या १२ महिन्यांत उत्पादनात वाढ होण्याचा विश्वास होता. परंतु, पश्चिम आशियातील संकट आणि खर्चाच्या दबावामुळे निर्माण झालेल्या चिंतेमुळे मार्च महिन्याच्या तुलनेत सकारात्मक भावना कमी झाली. नोकरीच्या आघाडीवर, कंपन्यांनी पहिल्या आर्थिक तिमाहीच्या सुरुवातीला अधिक कामगारांची भरती केली. त्यांच्या मते, नव्या व्यवसायाच्या वाढत्या प्रमाणामुळे अल्प-मुदतीचे कर्मचारी आणि कनिष्ठ-स्तरीय प्रशिक्षणार्थींच्या भरतीला चालना मिळाली.

एप्रिलमध्ये सेवा क्षेत्राचा ‘पीएमआय’ ५८.८ या ५ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. नवी निर्यात काहीशी मंदावली असली, तरीही व्यवसायातील उलाढाल आणि नव्या ऑर्डरमध्ये वाढ झाली आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे मागणी आता परदेशी बाजारपेठांकडून देशांतर्गत ग्राहकांकडे वळत असल्याचे यावरून दिसून येते.
- प्रांजुल भंडारी, मुख्य अर्थतज्ज्ञ, एचएसबीसी इंडिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय सत्तेपासून दूर राहिला तर कोण मारणार बाजी? स्टालिन फिरवू शकतात गेम, तर राज्यपालांकडे शेवटचा पर्याय

IPL 2026 Point Table: सनरायझर्स हैदराबादचा विजय अन् प्ले ऑफच्या शर्यतीत मोठी उलथापालथ; कूपर कॉनलीचे शतक व्यर्थ

llegal Mining Crackdown: धावत्या जेसीबीला लटकून ३ किमी पाठलाग; नायब तहसीलदारांची धाडसी कारवाई

विराटचा एकेकाळचा टीममेट, पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटरचं वयाच्या ३६व्या वर्षी निधन; युवराज म्हणाला, त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम...

Crime: धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून पत्नीसोबत वाजलं; रागाच्या भरात पतीनं स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT