मुंबई

ॲफकॉन कंपनीला १६ कोटींचा दंड

CD

ॲफकॉन कंपनीला १६ कोटींचा दंड
मेट्रोसाठी माती उत्खननात अनियमितता; तहसीलदारांकडून कारवाई

भिवंडी, ता. ६ (वार्ताहर) : मेट्रो-५ प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या माती उत्खननात अनियमितता आढळून आल्याने ॲफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीवर भिवंडी तहसीलदार कार्यालयामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कंपनीवर तब्बल १६ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्प ५अंतर्गत भिवंडी ग्रामीण भागातील राहनाळ, पूर्णा, काल्हेर, कोपर आणि कशेळी परिसरात मोठ्या प्रमाणात माती उत्खनन करण्यात आले होते; मात्र संबंधित परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात माती काढण्यात आल्याचा ठपका कंपनीवर ठेवण्यात आला आहे. महसूल विभागाने केलेल्या पंचनामा व चौकशी अहवालातून सुमारे १५ हजार ४५४ ब्रास मातीचे अनधिकृत उत्खनन झाल्याची माहिती समोर आली आहे. या उत्खननासंदर्भातील रॉयल्टीची आवश्यक कागदपत्रे कंपनीकडून सादर करण्यात आली नसल्याने महसूल प्रशासनाने कठोर भूमिका घेत दंडात्मक कारवाई केली आहे. अवैध माती भरावप्रकरणी संबंधित कंपनीला १६ कोटी ४७ लाखांचा दंड आकारण्यात आला असून, आदेश प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत दंडाची रक्कम शासकीय खजिन्यात जमा करून त्याची चलन प्रत कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे पालन न केल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदी नुसार थकबाकी वसुलीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती भिवंडी तहसीलदार अभिजित खोले यांनी दिली आहे.
---
यापूर्वीही ठोठावला १० कोटींचा दंड

यासंदर्भात मनसे कामगार सेना भिवंडीचे अध्यक्ष संतोष साळवी यांनी सांगितले, की यापूर्वीही याच कंपनीवर रॉयल्टी प्रकरणात सुमारे १० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता; मात्र कंपनीने त्या आदेशाविरोधात प्रांताधिकाऱ्यांकडे अपील केले होते. आता शासनाने लावलेला दंड संबंधित कंपनीने निर्धारित मुदतीत भरला नाही, तर मनसेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संतोष साळवी यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट ! सियाला केतनसोबत लोहगडावर जायचे नव्हते, पण... आईचा मोठा दावा

Music Benefits: गाण्यामुळे मनाला का मिळते एवढी शांतता ? जाणून घ्या,'म्युझिक थेरपी'मागचं विज्ञान...

Wilson Point Mahabaleshwar : पर्यटकांच्या 'या' कृत्यामुळे महाबळेश्वरचा विल्सन पॉइंट आता सूर्यास्तानंतर राहणार पूर्णपणे बंद; पाळीव प्राण्यांनाही नो-एन्ट्री!

Hinjewadi Metro: प्रवाशांना मोठा दिलासा! हिंजवडी मेट्रो प्रवाशांसाठी चौदा मार्गांवर बससेवा; दोन कंपन्यांशी करार, पहिल्या टप्प्यात २० बस

Accident News: एका क्षणात संपलं सगळं! संभाजीनगरातील चार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर, चार व्यावसायिकांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT