एसआयआयएलसी
कोरियन स्किन-हेअर ट्रीटमेंट सेमिनार
पुणे, ता. ६ : सौंदर्य क्षेत्रात सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या कोरियन स्किन व हेअर ट्रीटमेंट्सविषयी मार्गदर्शन करणारा एकदिवसीय सेमिनार पुण्यात होणार आहे. यात आधुनिक स्किन व हेअर केअर तंत्रज्ञानाची माहिती प्रात्यक्षिकांसह देण्यात येईल. यात तीन प्रकारचे फेशियल्स व दोन प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट्सचे डेमो, पिग्मेंटेशन ट्रीटमेंट, ॲक्ने (ग्रेड १ ते ४) व्यवस्थापन, तसेच केस गळती व केस पातळ होण्यावरील उपचार यांचा समावेश आहे. तसेच ‘ग्लास स्किन’ या संकल्पनेमागील तंत्र आणि भारतीय त्वचेसाठी त्याची अंमलबजावणी कशी करावी, पिग्मेंटेशन, ॲक्ने, केस गळती व अलोपेशिया यांसारख्या समस्यांवर न्यूट्रास्युटिकल्स व सप्लिमेंट्सची भूमिका याचेही मार्गदर्शन होईल. सहभागींना प्रमाणपत्र, अभ्यासिका (नोट्स) व अल्पोपाहार देण्यात येईल.
डिहायड्रेशन व्यवसाय प्रशिक्षण
निर्जलीकरण व्यवसाय संधींविषयी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण थेट निर्जलीकरण उद्योग प्रकल्पात ९ मे रोजी आयोजिले आहे. प्रशिक्षणात निर्जलीकरण म्हणजे काय, या तंत्रज्ञानाचे महत्त्व, उपयोग, व्यवसाय म्हणून तो कसा करावा, निर्जलीकरणासाठीचे प्रमुख घटक, वेगवेगळ्या पद्धती, निर्जलीकरणाद्वारे तयार होणारे घटक पदार्थ व त्याचे उपयोग, उत्पादन व बाजारातील किंमत, निर्जलीकरणासाठी लागणाऱ्या मशिनरी, त्याचा फ्लो चार्ट, उपलब्ध बाजारपेठ, विपणन पद्धती, शासकीय योजना व अनुदान, प्रकल्प उभारण्यासाठी जागेची निवड, अंदाजे गुंतवणूक, प्रकल्प अहवाल इत्यादी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. फळभाज्या, पालेभाज्या, कंद, पानवर्गीय वनस्पती, आयुर्वेदिक वनस्पती, फळे, दुग्धजन्य पदार्थ, मास, मच्छी, चिकन या पदार्थांचे प्रात्यक्षिक होणार आहे.
प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी व्यवसाय प्रशिक्षण
प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी ९ व १० मे रोजी होणार आहे. सुरक्षा सेवांची वाढती गरज लक्षात घेता या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत आहेत. प्रशिक्षणात प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी (PSARA) कायद्याची सविस्तर माहिती, लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली जाणार आहे. यासोबतच मॅनपॉवर व्यवस्थापन, सिक्युरिटी गार्ड्सची निवड व प्रशिक्षण, तसेच कार्यक्षम टीम उभारण्याच्या पद्धती, व्यवसायाचे कॉस्टिंग, सेवा दर ठरवणे, क्लायंट मिळवण्याच्या प्रभावी युक्त्या, मार्केटिंग तंत्र यावर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
एसआयआयएलसीच्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७
क्यूआर कोड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.