पनवेल, ता. ६ (वार्ताहर) : बँकेने सील केलेले फ्लॅट स्वस्त किमतीत मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून एका टोळीने कळंबोली परिसरातील चार व्यक्तींकडून १४ लाख ११ हजार रुपये उकळून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या टोळीतील चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा केला आहे.
मोहम्मद हाफीज अब्दुल रशीद सलवानी हे कळंबोलीतील रोडपाली भागात राहण्यास असून त्यांना फ्लॅट खरेदी करायचा होता. त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. याचवेळी संशयित टोळीने त्यांना बँकेने सील केलेले फ्लॅट कमी किमतीत मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवले होते. त्यानंतर या टोळीने त्यांना खारघर येथील देशमुख ब्लॉसम बी या इमारतीमधील बँकेने सील केलेला फ्लॅट स्वस्त किमतीत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. या प्रलोभनाला बळी पडून मोहम्मद हाफीज यांनी टोळीकडे चार लाख ११ हजार रुपये दिले होते. मात्र, पैसे घेऊनही त्यांनी मोहम्मद हाफीज यांना ना फ्लॅट मिळवून दिला, ना घेतलेले पैसे परत केले.
या टोळीने त्यांच्याप्रमाणेच बँकेने सील केलेले फ्लॅट स्वस्तात मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून रामभुवन जैसवार आणि उमेश जैसवार यांच्याकडून आठ लाख रुपये, प्रदीप गुप्ता यांच्याकडून दोन लाख रुपये उकळल्याचे मोहम्मद हाफीज यांना समजले. त्यानंतर त्यांनी या टोळी विरोधात कळंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार मोहम्मद आरिफ, मोहंमद तजमुल अन्सारी, जगत नारायण जवाहरलाल कश्यप आणि अशपाक सिकंदर मुजावर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.