मुंबई

स्वच्छतेचा प्रस्ताव चौकशीच्या फेऱ्यात

CD

स्वच्छतेचा प्रस्ताव चौकशीच्या फेऱ्यात
स्थायी समितीत अनेक त्रुटींवर बोट

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये तीन वर्षांच्या नियमित स्वच्छतेच्या कामासाठी लागणारी सेवा पुरविण्यासाठी कंत्राटदार नेमण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावात अनेक त्रुटींवर बोट ठेवत या प्रस्तावाची सर्वंकष चौकशी करावी, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिली.
प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवा, अशी मागणी सत्ताधारी पक्षाने, तर प्रस्ताव मागे घेऊन नव्याने प्रस्ताव आणावा, अशा मागणीची चढाओढ सत्ताधारी आणि विरोधी पक्षात दिसून आली. पालिकेच्या मुख्य रुग्णालयांमध्ये सफाईचे कंत्राट स्थायी समितीत मंजुरीसाठी येताच सभागृहनेते गणेश खणकर यांनी जोरदार आक्षेप घेतला. एकाच कंत्राटदाराला हे कंत्राट दिले जाऊ नये. या कामाची मक्तेदारी कशासाठी, असा सवाल करीत त्यांनी हा प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठविण्याची सूचना केली.
मुंबई महापालिकेच्या आठ रुग्णालयांत स्वच्छतेचे तीन वर्षांसाठी १०१ कोटींचे कंत्राट देण्यात येणार आहे. ९२ लाखांचे कंत्राट असताना कंत्राटदार १८ लाख कमी करून काम करण्यास तयार झाले. यावरून कामाचा दर्जा राखला जाणार का, असा सवाल काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी उपस्थित केला. हा प्रस्तावच रद्द करावा आणि नव्याने आणावा, अशी मागणी आझमी यांनी केली. भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांनी पत्र देत कंत्राट रद्द करण्याची मागणी केली.
संपूर्ण भारतात वेतनाप्रमाणे काम दिले जाते; परंतु पालिकेच्या रुग्णालयात चौरस फुटांप्रमाणे काम देण्यात येणार आहे. २९ हजार वेतन देणार, तर आठ रुग्णालयांत २४ कोटी १९ लाख २० हजार रुपये वेतनापोटी दिले जाणार आहे. त्यामुळे या कंत्राटात ७७ कोटी रुपये अधिक रक्कम दिली जाणार असून हा घोटाळा आहे, असा आरोप मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी केला. या प्रस्तावावर शिवसेना ठाकरे पक्षाचे शैलेश फणसे, श्रद्धा जाधव यांनी मते मांडली.
...
विरोधानंतर फेरविचारार्थ...
प्रस्तावाला झालेला विरोध लक्षात घेऊन स्थायी समितीत प्रस्ताव फेरविचारार्थ पाठविण्यात आला. हा प्रस्ताव रद्द करून नव्याने आणण्याची सूचना समितीने फेटाळली. या प्रस्तावाची सर्वंकष चौकशी करून सुधारित प्रस्ताव पुन्हा समितीपुढे मंजुरीसाठी आणावा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिली. त्यामुळे याप्रकरणी सर्वंकष चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय सत्तेपासून दूर राहिला तर कोण मारणार बाजी? स्टालिन फिरवू शकतात गेम, तर राज्यपालांकडे शेवटचा पर्याय

IPL 2026 Point Table: सनरायझर्स हैदराबादचा विजय अन् प्ले ऑफच्या शर्यतीत मोठी उलथापालथ; कूपर कॉनलीचे शतक व्यर्थ

llegal Mining Crackdown: धावत्या जेसीबीला लटकून ३ किमी पाठलाग; नायब तहसीलदारांची धाडसी कारवाई

विराटचा एकेकाळचा टीममेट, पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटरचं वयाच्या ३६व्या वर्षी निधन; युवराज म्हणाला, त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम...

Crime: धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून पत्नीसोबत वाजलं; रागाच्या भरात पतीनं स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT