मुंबई

दिव्यात दिवसाढवळ्या आठ लाखांची घरफोडी

CD

ठाणे, ता. ६ : दिवा पूर्व परिसरात दिवसाढवळ्या घरफोडी करून चोरट्याने आठ लाख ३१ हजार ८०० रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. बाथरूमच्या खिडकीतून घरात प्रवेश करून चोरट्याने ही चोरी केल्याचे समोर आले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
मुंब्रा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवा आगासन रोडवरील एकविरा गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पांडुरंग शेळके (वय ४९) हे कुटुंबासह राहतात. ते मंगळवारी (ता. ५) पहाटे कामावर गेले होते. त्यानंतर सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नीने घराला कुलूप लावून कामासाठी बाहेर पडल्या. दुपारी ३.१५ वाजता घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. माहिती मिळताच पांडुरंग यांनी घराकडे धाव घेत पाहणी केली. या वेळी त्यांना किचनमधील लोखंडी कपाटाचे लॉकर आणि ड्रॉव्हर तुटलेल्या अवस्थेत आढळले. तसेच बाथरूमच्या खिडकीची काच काढून चोरट्याने घरात प्रवेश केल्याचे उघड झाले. चोरट्याने मंगळसूत्र, सोनसाखळी, कानातील दागिने आणि अंगठी असा एकूण आठ लाख ३१ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT