मुंबई

६८० रुपयांची लाईट ९ हजाराला खरेदी

CD

६८० रुपयांचे पथदिवे नऊ हजारांना!
६३ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; श्वेतपत्रिकेची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः स्कायवॉकच्या खाली चांगल्या दर्जाचे पथदिवे लावा, असे निर्देश राज्य सरकारने मुंबई महापालिका प्रशासनाला दिले होते; मात्र मुंबई महापालिकेच्या मेंटेनन्स अँड इंजिनिअर विभागाने जेम पोर्टलवर ६८० रुपयांचे पथदिवे चक्क ९,९९३ रुपयांना खरेदी केले. मेंटेनन्स अँड इंजिनिअर विभागात तब्बल ६३ कोटींचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप स्थायी समिती सदस्य मकरंद नार्वेकर यांनी आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केला.
मुंबई महापालिकेच्या चार वर्षांतील प्रशासकीय काळातील श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. याप्रकरणी सविस्तर चर्चा करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी शिंदे सेना (शिंदे) पक्षाचे पालिकेतील गटनेते अमय घोले यांनी केली. या प्रकरणाची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी आणि १५ दिवसांत चौकशी अहवाल सादर करा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी या वेळी दिले. तसेच अहवाल प्राप्त होईपर्यंत नार्वेकर यांचा हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्यात येतो, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
स्कायवॉकच्या खाली चांगल्या दर्जाचे पथदिवे लावा, असे निर्देश राज्य सरकारने मुंबई महापालिका प्रशासनाला दिले होते; मात्र मुंबई महापालिकेच्या मेंटेनन्स अँड इंजिनिअर विभागाने ७०० रुपयांचे पथदिवे नऊ हजार रुपयांत खरेदी केली. जेम पोर्टलवर ६८० रुपयांत एलईडी पथदिवे मिळत असताना नऊ हजार रुपयांत खरेदी करण्याची काय गरज, असा सवाल मकरंद नार्वेकर यांनी उपस्थित केला.
...
चौकशी करण्याची मागणी
काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी मध्यवर्ती खरेदी विभागाचीही चौकशी करण्याची मागणी करीत, मागील चार वर्षांतील सर्व व्यवहारांवर श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय सत्तेपासून दूर राहिला तर कोण मारणार बाजी? स्टालिन फिरवू शकतात गेम, तर राज्यपालांकडे शेवटचा पर्याय

IPL 2026 Point Table: सनरायझर्स हैदराबादचा विजय अन् प्ले ऑफच्या शर्यतीत मोठी उलथापालथ; कूपर कॉनलीचे शतक व्यर्थ

llegal Mining Crackdown: धावत्या जेसीबीला लटकून ३ किमी पाठलाग; नायब तहसीलदारांची धाडसी कारवाई

विराटचा एकेकाळचा टीममेट, पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटरचं वयाच्या ३६व्या वर्षी निधन; युवराज म्हणाला, त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम...

Crime: धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून पत्नीसोबत वाजलं; रागाच्या भरात पतीनं स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT