‘भूमी डेव्हलपर्स’विरुद्ध खासदार म्हात्रे न्यायालयात
भिवंडीतील आरक्षित जागांवर बांधकाम केल्याचा दावा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : भिवंडीतील ‘भूमी असोसिएट्स ॲण्ड डेव्हलपर्स’ने सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षित जागांवर बांधकाम केल्याचा दावा करणारी जनहित याचिका भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी उच्च न्यायालयात केली आहे. तसेच या बांधकामावर कारवाईची मागणीही केली आहे.
‘भूमी वर्ल्ड’ (औद्योगिक पार्क आणि रिटेल मॉल) ही बांधकामे एमएमआरडीएच्या २००८ ते २०२८च्या विकास आराखड्यानुसार वाहतूक केंद्र, लॉजिस्टिक पार्क, उद्यान, मासळी बाजार, भाजी मंडई आणि जलवाहिनीसारख्या सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षित असलेल्या जागांवर बेकायदा करण्यात आल्याचा दावा म्हात्रे यांनी ॲड. आशीष गायकवाड यांच्यामार्फत याचिकेतून केला आहे. एमएमआरडीएच्या अधिकृत नोंदीनुसार, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना (एमआरटीपी) कायद्याच्या कलम ४५ अंतर्गत कोणतीही विकास परवानगी घेण्यात आली नसल्याचेही याचिकेत म्हटले आहे.
म्हात्रे यांचे म्हणणे
ही बांधकामे म्हणजे नगररचना नियमांचे घोर उल्लंघन आणि सार्वजनिक जमिनीवरील अतिक्रमण असून, हे शहराच्या पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात ताण आणणारे आहे आणि नियोजित विकासाच्या कायद्याला न जुमानणारे आहे, असा दावाही म्हात्रे यांनी याचिकेत केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.