मुंबई

मिरा रोड येथील स्पा सेंटरवर धाड

CD

थोडक्यात

मिरा रोड येथील
स्पा सेंटरवर धाड
भाईंदर (बातमीदार) : मिरा रोड परिसरातील एका स्पा मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसाय पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या कारवाईत व्यवस्थापकासह दोन जणांना अटक करण्यात आली असून, तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कनाकिया रस्त्यावरील एका इमारतीत असलेल्या ‘जॉन क्विले’ या थाई स्पामध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेघना बुरांडे यांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. या वेळी व्यवस्थापकासह दोन जणांना अटक करण्यात आली, तर स्पाचा मालक फरार झाला आहे. पोलिसांनी स्पामधील तीन महिलांची सुटका केली असून पुढील तपास सुरू आहे.
-----
कल्याण रेल्वे स्थानकात
मोबाईल चोरट्यांना अटक
कल्याण (वार्ताहर) : रेल्वे पोलिसांनी स्थानक परिसरात प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपींकडून चोरीचे अनेक मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी मोठ्या संख्येने प्रवासी कल्याण स्थानकात येतात. प्रवासी थकव्यामुळे स्थानक परिसरात झोप घेत असताना ही टोळी त्यांचे मोबाईल चोरत असे. अक्षय ढेकले, शाहबाज खान आणि अशोक मोरे अशी अटक आरोपींची नावे आहेत. वाढत्या तक्रारींनंतर पोलिसांनी पाळत ठेवून संशयित हालचालींवर नजर ठेवत या तिघांना ताब्यात घेतले. या टोळीतील इतर सदस्यांचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
-----
आत्महत्या प्रकरणातील
आरोपीचा जामीन फेटाळला
अंबरनाथ (वार्ताहर) : येथील एस-थ्री पार्क हॉटेलमधील तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली असून, आरोपी भगवान लोटे याचा अटकपूर्व जामीन कल्याण सत्र न्यायालयाने फेटाळला आहे; मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतरही आरोपी फरार असल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मृत तरुणी सिमरन पाटील ही लोटेच्या कंपनीत अकाउंटंट म्हणून कार्यरत होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सिमरनकडून आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित काम करून घेतल्याचा आणि नोकरी सोडण्याचा प्रयत्न केल्यावर तिला दबाव टाकल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

T20 WC, IND W vs SA W : स्मृती-शफालीची तुफान सुरुवात, पण द. आफ्रिकेने आवळले फासे; तरीही टीम इंडिया दीडशे पार

NEET 2026 Retest: NEET पुनर्परीक्षा अवघड: भौतिकशास्त्र-रसायनशास्त्राने विद्यार्थ्यांची कसोटी, कट-ऑफ व गुणवत्ता यादीवर परिणामाची शक्यता

PM Kisan eKYC : तांत्रिक अडचणींनी पीएम किसान ई-केवायसी ठप्प; हजारो शेतकरी हप्त्यापासून वंचित होण्याची भीती

Buldhana Andura Accident: अंदुराजवळ एसटी बस-दुचाकी भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावरील भेगांमुळे नियंत्रण सुटल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT