तुंगारेश्वरातून वाघ, बिबट्या गायब
अभयारण्यात पशू-पक्ष्यांच्या ५० हून अधिक प्रजाती
विरार, ता. ७ (बातमीदार) ः बुद्ध पौर्णिमेनिमित्त तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यातील प्राणी गणनेत ५० हून अधिक पशू-पक्ष्यांच्या नोंदी करण्यात आल्या. या प्रगणनेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर यशस्वी ठरला असला तरी वाढते अतिक्रमण, मानवी घुसखोरीने वाघ, बिबट्याचे अस्तित्व मात्र दिसले नाही.
जूचंद्र पाझर तलाव परिसरात सर्वाधिक २५ नोंदी करण्यात आल्या. यात कोकिळा, भारद्वाज, तांबट, सिपाही बुलबुल, लाल बुडाचा बुलबुल, घार, शिंपी, लहान बगळा, मध्यम बगळा, गाय-बगळा यासह सरडा, खंड्या पक्ष्याचे दर्शन घडले. रात्रीच्या वेळी रात्रवा, सातभाई, राखाडी वटवट्या, वेडा राघूस, लहान पाणकावळा यांचे आवाज टिपले. तसेच चिंचोटी, दहीहंडी परिसरात वानर, साप, घुबडांच्या नोंदी झाल्या. तर कामण पश्चिम भागात उदमांजर, कॉमन हॉक-कुक्कू पक्ष्यांबरोबर पेल्हार धरण क्षेत्रात मोरांचा केकारव, वानरांचा वावर आहे. तर परोल खोकर नाला परिसरात दयाळ, काळ्या मानेचा कस्तूर पक्ष्यांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
-----------------------------
अभयारण्याच्या हद्दीतील मानवी घुसखोरी चिंतेचा विषय बनली आहे. वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासात व्यत्यय येत असून पर्यटकांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे अनेक प्राण्यांना सुरक्षित जागा शोधण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
- आर. पी. साळवे, परिक्षेत्र वनअधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.