मुंबई

सांगे कौटुंबीच्या पाड्याचा रस्ता पूर्ण

CD

सांगे कौटुंबीच्या पाड्याला सिमेंटचा रस्ता
श्रमजीवी संघटनेच्या प्रयत्नांना यश

वाडा, ता. ७ (बातमीदार) ः तालुक्यातील सांगे कौटुंबीचा पाडा रस्त्याअभावी विविध अडचणींचा सामना करीत होता. श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा केला जात होता. अखेर पाड्यासाठीचा हक्काचा काँक्रीटचा रस्ता पूर्ण झाल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे.
भौगोलिकदृष्ट्या दुर्गम भागातील सांगे कौटुंबीचा पाड्यातील नागरिक मूलभूत सुविधेपासून वंचित होते. ही भीषण परिस्थिती बदलण्यासाठी श्रमजीवी संघटनेने २०२३ पासून लढा पुकारला आहे. तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालयावर निवेदने, मोर्चातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यासाठी पालघर जिल्हा महिलाप्रमुख रेखा पऱ्हाड, वाडा तालुकाध्यक्ष भरत जाधव, तालुका सचिव सूरज दळवी, माजी उपाध्यक्ष सुरेश पऱ्हाड यांनी केलेले मार्गदर्शन मोलाचे राहिले.
---------------------
ग्रामस्थांमध्ये आनंदोत्सव
आमच्या अनेक पिढ्यांनी रस्त्यासाठी प्रतीक्षा केली; पण श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या निःस्वार्थी कष्टांमुळे स्वप्न सत्यात उतरले आहे, अशी कृतज्ञता स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात रात्रभर पावसाची संततधार, अनेक भागांत साचले पाणी; वाहतूक कोंडीने पुणेकर त्रस्त, वाहनांच्या लागल्या रांगा

Sonvi Bridge Accident in Sangameshwar : सोनवी पुलावर दोन ट्रकची धडक; एकाच मार्गिकेतून दुहेरी वाहतुकीचा फटका; महामार्गावर वाहनांच्या रांगा

Latest Marathi News Live Update : मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचे ढग; पुढील काही तास पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता

Mumbai Rain Update: इस्ट टू वेस्ट! वाहतूक कोंडीने मुंबईकर त्रस्त; रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Tukaram Mundhe Crackdown : मुंढेंच्या दणक्याने हॉटेल्सही 'सरळ'! आधी सिलिंडर, आता 'एफडीए'मुळे मेन्यूमध्ये कपात; पनीर, चीज, खवा 'गायब'च

SCROLL FOR NEXT