मुंबई

प्रशासनाकडून काही मागण्या मान्य

CD

कष्टकऱ्यांच्या आंदोलनाची दखल
माकपच्या मोर्चानंतर प्रशासनाकडून मागण्या मान्य

कासा, ता. ७ (बातमीदार) ः शेतकरी, कष्टकरी, आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी मंगळवारी (ता. ५) पारनाका ते प्रांत कार्यालयावर काढलेल्या माकपच्या मोर्चाची प्रशासनाने तातडीने दखल घेत काही महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच उर्वरित मागण्यांवर ठरावीक कालावधीत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
या मोर्चात १५ हजार आंदोलनकर्त्यांनी सहभाग घेतला. मोठ्या संख्येने जमलेल्या आंदोलकांमुळे सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनावर दबाव निर्माण केला. मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देत आंदोलनकर्त्यांनी प्रांत कार्यालयाच्या आवारात आंदोलन छेडले होते. या वेळी आंदोलकांमधील उत्साह लक्षात घेऊन प्रशासनाने उशिरापर्यंत बैठक घेत विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. त्यानंतर प्रशासनाने काही मागण्या तत्काळ मान्य करत लेखी आश्वासन दिले, तर उर्वरित मागण्यांवर लवकर कार्यवाही करण्याचे मान्य केले.
---------------------------
‘या’ प्रस्तावांवर कार्यवाही
- डहाणू तालुक्यातील वाकी गावातील ८६ वैयक्तिक वनहक्क दाव्यांमधील त्रुटी दूर करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित प्रस्ताव ३० जून २०२६ पर्यंत पुन्हा सादर करण्यात येणार असून उर्वरित दाव्यांवरही आवश्यक प्रशासकीय कार्यवाही केली जाईल.
- ‘मातृभूमी रिअल टच डेव्हलपमेंट लिमिटेड’ कंपनीविरोधातील लाखो रुपयांच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणात पोलिसांनी तपासाला गती दिली असून गुन्हा दाखल करण्यासाठी प्रस्ताव लवकरच पालघर पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT