मुंबई

चोरीसाठी घरात घुसलेल्या मुलाचा महिलेवर हल्ला

CD

मुरबाड, ता. ७ (वार्ताहर) : तालुक्यातील शिवळे येथे एका अल्पवयीन मुलाने चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश करून, प्रतिकार करणाऱ्या महिलेवर चाकूने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवळे येथील आपल्या राहत्या घरी सोमवारी (ता. ४) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सायली संजय उसासे झोपल्या होत्या. याच वेळी एका १२ वर्षे १० महिने वयाच्या मुलाने घराच्या पाठीमागील खिडकीवाटे घरात प्रवेश केला. कपाटातील ऐवज चोरण्याच्या उद्देशाने त्याने कपाट उघडले असता, आवाजामुळे सायली यांना जाग आली. त्यांनी या चोरीला विरोध करण्याचा प्रयत्न केला. यावेळी या मुलाने धारदार चाकूने सायली यांच्या छातीवर, मानेवर, पोटावर आणि पाठीवर वार केले. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गणेश काळूराम इसामे (वय ४१) यांनी मुरबाड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

10th Exam Result: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाचा SSC निकाल ८ मे रोजी लागणार; ‘या’ वेबसाईटवर पाहता येणार

Akola Crime : ड्रोन कॅमेरे, श्वान पथक अन् 100 पोलिसांची फौज! सावरगावचं जंगल पिंजून काढत 10 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या 60 वर्षीय नराधमाला अटक

Latest Marathi News Live Update : डीएमकेने आज आपल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अनेक ठराव मंजूर केले

IPL players could face restrictions क्रिकेटर्स गर्लफ्रेंड्सना हॉटेलमध्ये घेऊन जाऊ शकणार नाहीत? BCCI ने हार्दिक पांड्या, अर्शदीपसह अनेकांना दिली वॉर्निंग

Eknath Shinde: पायलटचं प्रसंगावधान अन् मोठा अपघात टळला! मुरबाडला जाणारे एकनाथ शिंदेंचे हेलिकॉप्टर जुहूमध्ये कसे उतरवले?

SCROLL FOR NEXT