मुंबई

मोकळे भूखंड विक्रीच्या बहाण्याचे गंडा

CD

नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : मोकळे भूखंड विकत देण्याचे प्रलोभन दाखवून एका टोळीने १५ गुंतवणूकदारांकडून तब्बल ५७ लाख ३६ हजार रुपये उकळून त्यांना फ्लॉट अथवा त्यांची रक्कम परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सीबीडी पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य संशयित तेजस डाकी व त्याच्या इतर साथीदारांविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.

संशयित टोळीने जून २०२२ मध्ये सीबीडी परिसरात लँडलॉर्डस् रिअलटर्स या कंपनीचे कार्यालय सुरू केले होते. त्यानंतर त्यांनी उरण तालुक्यातील वाशवे, वशेणी व पुनाडे या भागातील मोकळे भूखंड विकत देण्याची जाहिरातबाजी केली होती. त्याला भुलून अनेक गुंतवणूकदारांनी या कंपनीकडे धाव घेतली. संशयितांनी या गुंतवणूकदारांकडून भूखंडाच्या मोबदल्यात मोठी रक्कम घेतली. मात्र, पैसे घेऊनही आरोपींनी ना जमिनीचा ताबा दिला, ना गुंतवणूकदारांचे पैसे परत केले.

या प्रकरणात फसवणूक झालेल्यामध्ये पुष्करसिंग रावत याच्यासह प्रवीण चंदनशिव, प्रदीप भाटकर, सुनील वाडकर, कांतीलाल पटेल, गौरव वरसोलकर, राजिंदर सिंग, हफिज अन्सारी, मनोज होळकर, नानी मंडल, तुकाराम ढेपे, सचिन शहाणे, सुनील शेट्टी व इतरांचा समावेश आहे. या सर्वांना मिळून ५७ लाख ३६ हजारांचा गंडा घालण्यात आला असून, या १५ गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन सीबीडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तेजस डाकी, शुभांगी शिंदे, मनोहर म्हात्रे, प्रेम डाकी, संदेश पाटील, विशाल, प्रीती डाकी आणि श्रीकांत भंडारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case : मुलीच्या शरीरावर टणक हत्याराने वार केल्याने जखमा; शवविच्छेदन अहवालात आणखी काय? आरोपीला कुणी केली मदत?

Baramati Politics: अजितदादांच्या अपघाती जाण्याने जनतेचे स्वप्न अधुरे; २०२९ मध्ये सुनेत्रा वहिनींनीच बारामतीतून लढावे : जय पवार

Latest Marathi News Live Update : डीएमकेने आज आपल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अनेक ठराव मंजूर केले

Bihar Cabinet Expansion : बिहारमध्ये 'निशांत' पर्व सुरू! नितीश कुमारांच्या सुपुत्राकडं आरोग्य विभागाची धुरा; 32 नव्या मंत्र्यांची शपथ, भाजपच्या 9 बड्या नेत्यांना डच्चू

iPhone 17 चक्क 45 हजारपेक्षा कमी किंमतीत मिळतोय; 'इथे' खरेदी केल्यास मिळेल बंपर डिस्काउंट, ऑफर सुरू होताच लागल्या रांगा

SCROLL FOR NEXT