मुंबई

''लाडक्या बाप्पाची मूर्ती स्वतः घडवा’

CD

बदलापूर, ता. ७ (बातमीदार) : पारंपरिक गणेशोत्सवाचे महत्त्व जपत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने कुळगाव-बदलापूर नगर परिषद आणि श्री गणेश मूर्तीकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य शाडू गणेशमूर्ती कला कार्यशाळा होणार आहे. ही कार्यशाळा १६ आणि १७ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत बदलापूर पूर्वेतील गांधी चौक परिसरातील नगर परिषद शाळा क्रमांक १ येथे होणार आहे.
वाढत्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेता नागरिकांनी पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींकडे वळावे, तसेच पारंपरिक मूर्तीकलेचे संवर्धन व्हावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला आवश्यक साहित्य पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. मातीपासून स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती साकारण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. अनुभवी आणि तज्ज्ञ मूर्तिकारांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शनही केले जाणार आहे. त्यामुळे कला शिकण्याची आवड असलेल्या नागरिकांसाठी ही कार्यशाळा विशेष आकर्षण ठरणार आहे. या कार्यशाळेत १२ वर्षांवरील सर्व इच्छुकांना सहभागी होता येणार आहे. तयार केलेली गणेशमूर्ती घरी नेण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्जनशीलता, पारंपरिक कला आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळणार असल्याचे आयोजकांनी नमूद केले. लहान मुले, युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान, पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही काळाची गरज असून प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने शाडूच्या मूर्तींचा स्वीकार करावा, असे आवाहन नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी नागरिकांना केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case : मुलीच्या शरीरावर टणक हत्याराने वार केल्याने जखमा; शवविच्छेदन अहवालात आणखी काय? आरोपीला कुणी केली मदत?

Baramati Politics: अजितदादांच्या अपघाती जाण्याने जनतेचे स्वप्न अधुरे; २०२९ मध्ये सुनेत्रा वहिनींनीच बारामतीतून लढावे : जय पवार

Latest Marathi News Live Update : डीएमकेने आज आपल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अनेक ठराव मंजूर केले

Bihar Cabinet Expansion : बिहारमध्ये 'निशांत' पर्व सुरू! नितीश कुमारांच्या सुपुत्राकडं आरोग्य विभागाची धुरा; 32 नव्या मंत्र्यांची शपथ, भाजपच्या 9 बड्या नेत्यांना डच्चू

iPhone 17 चक्क 45 हजारपेक्षा कमी किंमतीत मिळतोय; 'इथे' खरेदी केल्यास मिळेल बंपर डिस्काउंट, ऑफर सुरू होताच लागल्या रांगा

SCROLL FOR NEXT