मुंबई

राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांची एससी-एसटी संसदीय कल्याण समितीवर निवड

CD

कल्याण समितीच्या सदस्यपदी चंद्रकांत हंडोरे
लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी केली निवड

चेंबूर, ता. ७ (बातमीदार) : राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांची लोकसभेच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (एससी-एसटी) संसदीय कल्याण समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली असून, हंडोरे हे १ मे २०२६ ते ३० एप्रिल २०२७ या कालावधीत या समितीवर कार्यरत राहतील.

या समितीच्या सभापतिपदी खासदार डॉ. फग्गन सिंग कुलस्ते यांचीही निवड करण्यात आली आहे. अनुसूचित जाती आणि जमातींच्या सर्वांगीण विकासासाठी ही समिती महत्त्वाची मानली जाते. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी, त्यावर देखरेख तसेच संबंधित समाजघटकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याची जबाबदारी या समितीवर असते. निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी सांगितले, की देशभरातील अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांच्या विकासासाठी ही समिती प्रभावीपणे कार्य करते. या माध्यमातून विविध भागांचा दौरा करून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांनी विशेषतः महाराष्ट्रातील नागरिकांना आवाहन केले, की त्यांच्या काही तक्रारी अथवा अडचणी असल्यास त्यांनी थेट संपर्क साधावा.

हंडोरे यांनी पुढे सांगितले, की या समितीकडे महत्त्वाचे अधिकार असून, अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कारवाई करण्याची क्षमता आहे. या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. दरम्यान, या निवडीबद्दल त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचे आभार मानले. त्यांच्या मार्गदर्शन आणि आशीर्वादामुळेच ही जबाबदारी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
राजकीय व सामाजिक क्षेत्रातून हंडोरे यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत असून, त्यांच्या माध्यमातून अनुसूचित जाती-जमातीच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Prediction : सोने १ लाख २५ हजारांवर पोहोचणार?, जून महिन्यात ८.२८ टक्क्यांनी दरात घसरण; तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज

Latest Marathi News Update : पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते

Success Story: दिवसा मोलमजुरी, पहाटे घाटरस्त्यावर धावण्याचा सराव; विकास काळेची प्रेरणादायी पोलिस भरारी, घर नाही, क्लास नाही... पण जिद्द होती..

Mhada Lottey : म्हाडाची लॉटरी रखडली, सोडत लांबल्याने अर्जदारांची आर्थिक ओढाताण

Pune: उरुळी कांचन येथे "कृषि विभागाच्या विविध योजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन मेळावा

SCROLL FOR NEXT