मुंबई

भिवंडीतील बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाच्या फलकांची दुर्दशा

CD

भिवंडी, ता. ७ (बातमीदार) : भिवंडी-कल्याण मार्गावर ‘एमएमआरडीए’ने उभारलेल्या उड्डाणपुलाच्या कल्याणरोड प्रवेशाच्या ठिकाणी असलेल्या फलकांची दुर्दशा झाल्याने शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. शहरातील लोकप्रतिनिधींनी लेखी पत्राद्वारे मागणी करूनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे.

भिवंडी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात कल्याण रोड ते स्व. राजीव गांधी चौकपर्यंत एमएमआरडीएच्या निधीतून उड्डाणपूल बांधून त्यास शिवसेना सरसेनापती स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले आहे. हा उड्डाणपूल पुढे स्व. राजीव गांधी उड्डाणपुलाला जोडलेला आहे. त्यामुळे या उड्डाणपुलास कल्याणरोडचे एकच प्रवेशद्वार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या प्रवेशद्वारावर लावलेल्या फलकांची दुर्दशा झालेली आहे. त्यामुळे नागरिक आणि शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या फलकांची दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार म्हात्रे यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे. मात्र, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दरम्यानच्या काळात कोणतीही दाखल न घेता या फलकांची दुरुस्ती केलेली नाही, अशी माहिती रूपेश म्हात्रे यांनी दिली.

कल्याणरोड येथील उड्डाणपुलाच्या नामफलकासोबत शहरातील इतरही उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारावरील नामफलकाचा प्रस्ताव तयार असून, त्यास मंजुरी मिळाल्यानंतर त्वरित या नामफलकाचे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती भिवंडी महापालिकेच्या बांधकाम विभागातील विशेष शहर अभियंता सचिन नाईक यांनी दिली.

भिवंडी : भिवंडीतील बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाच्या फलकांची दुर्दशा झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ARG vs Austria : लिओनेल मेस्सीचा विश्वविक्रमी गोल पाहिलात का? ज्याने अर्जेंटिनाला Fifa World Cup च्या पुढील फेरीत पोहोचवले Video Viral

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

Argentina vs Austria : ५६ वर्षानंतर चमत्कार झाला... लिओनेल मेस्सीचा World Cup मध्ये दरारा, ९६ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात तिघांनाच हा पराक्रम जमलाय...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

SCROLL FOR NEXT