उल्हासनगर, ता. ७ (वार्ताहर) : उल्हासनगरातील एका इमारतीविरोधात न्यायालयीन लढा देणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील यांनी आता थेट जीवाला धोका असल्याची तक्रार पोलिस आयुक्तांकडे केली आहे. ‘तेरा सुपारी निकला हैं... काम बजनेवाला हैं तेरा’ असा व्हॉट्सॲप संदेश हितचिंतकांकडून मिळाल्याचा दावा करत त्यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.
ॲड. स्वप्नील पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, उल्हासनगरातील एका इमारतीविरोधात त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. संबंधित इमारत नियमबाह्य असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी महापालिकेकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी इमारतीवर तोडक कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशाविरोधात इमारत मालकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती; मात्र त्या प्रकरणात ॲड. स्वप्नील पाटील यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करत कारवाई कायम ठेवण्याची मागणी केली होती. न्यायालयानेही तोडक कारवाईचे आदेश कायम ठेवल्याने कोणत्याही क्षणी इमारतीवर कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात सुमारे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची भावना संबंधितांकडून व्यक्त केली जात असून, मूळ मालकाच्या निधनानंतर त्यांच्या वारसांकडून द्वेषभावनेतून आपल्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.