मुंबई

केंद्राच्या धोरणांविरोधात कामगारांनी सज्ज व्हावे

CD

केंद्राच्या धोरणांविरोधात कामगारांनी सज्ज व्हावे
ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांचे आवाहन
शिवडी, ता. ७ (बातमीदार) ः केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणामुळे कामगार चळवळीने १०० वर्षांपूर्वीच्या संघर्षातून निर्माण केलेल्या कामगार कायद्यात बदल करून त्याचे चार लेबर कोडमध्ये रूपांतर केल्यामुळे कामगारांनी मिळवलेले हक्कच केंद्र सरकारने काढून घेतले आहेत. आज कामगार चळवळीसमोर अनेक आवाहने आहेत, त्यापैकी कामगारांच्या अस्तित्वाची लढाई फार महत्त्वाची आहे, असे उद्‌गार ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांनी जाहीर सभेत काढले.
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचा १०६वा वर्धापनदिन सोमवारी (ता. ४) माझगाव येथील कामगार सदन सभागृहात संपन्न झाला. सुरुवातीलाच डॉ. शांती पटेल व इतर कामगार नेत्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यानंतर सभेला सुरुवात करण्यात आली. शेट्ये यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पुढे सांगितले की, कामगार कायदे येण्यापूर्वी ३ मे १९२० रोजी बी.पी.टी. एम्प्लॉईज युनियनची स्थापना झाली. पोर्ट उद्योगातील ही सर्वात जुनी कामगार संघटना आहे. गोदी कामगारांना घरे मिळण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न चालू असून, आत्तापर्यंत घरांच्या प्रश्नावर दोन कामगार मेळावे घेतले. मात्र, जसा गिरणी कामगारांनी घरांसाठी लढा दिला, त्याप्रमाणे गोदी कामगारांनादेखील घरांसाठी लढा द्यावा लागेल, असे ते म्‍हणाले. या वेळी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्पलॉईज युनियनचे कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर व युनियनचे उपाध्यक्ष प्रदीप नलावडे, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे माजी बोर्ड मेंबर व युनियनचे सेक्रेटरी दत्ता खेसे यांच्यासह इतर मान्यवर उपस्‍थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case : मुलीच्या शरीरावर टणक हत्याराने वार केल्याने जखमा; शवविच्छेदन अहवालात आणखी काय? आरोपीला कुणी केली मदत?

Baramati Politics: अजितदादांच्या अपघाती जाण्याने जनतेचे स्वप्न अधुरे; २०२९ मध्ये सुनेत्रा वहिनींनीच बारामतीतून लढावे : जय पवार

Latest Marathi News Live Update : डीएमकेने आज आपल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अनेक ठराव मंजूर केले

Bihar Cabinet Expansion : बिहारमध्ये 'निशांत' पर्व सुरू! नितीश कुमारांच्या सुपुत्राकडं आरोग्य विभागाची धुरा; 32 नव्या मंत्र्यांची शपथ, भाजपच्या 9 बड्या नेत्यांना डच्चू

iPhone 17 चक्क 45 हजारपेक्षा कमी किंमतीत मिळतोय; 'इथे' खरेदी केल्यास मिळेल बंपर डिस्काउंट, ऑफर सुरू होताच लागल्या रांगा

SCROLL FOR NEXT